बघून अंधारात ही खिडकी
भरतेच मला धडकी
येईल वाटते तिथून एखादी भुताटकी
आणि बसेल माझ्या मानगुटी…
भयावह होऊन जाई मन सारं
हळूच कुठूनतरी कानावर येई वारं
बघितल्यावर भिंतीवची हाले खुंटी
भास माझा मलाच होई उडे माझी घाबरगुंडी…
वेड लागले की काय मला भीती का वाटतेय
सुन्न अंधाऱ्या रात्री खिडकीवर कोण नाचतेय
जाऊन बाहेर बघावं तर, सर्वांग माझं थरथरतंय
अरे देवा, ही कोण आहे जी मला झाडूने मारतेय…
झोपेतच आज काल स्वप्न भूतांचे पडते
सकाळी उठतो तेव्हा आई ओरडत असते
उठ रे, काय झोपेत बडबडतोयस वेड्या
जाणार नाहीत वाटतं तुझ्या ह्या, जन्मभर खोड्या…
✍️ विजय वैशाली दत्ताराम पराडकर
( आण्णा )
मुख्यसंपादक