बद्धकोष्ठता आणि अपचन यावर गुळ हे रामबाण उपाय आहे. साखर तर आधुनिक प्रकार आहे आणि तिच्यामुळे आरोग्याला धोका आहे. मात्र गुळात नैसर्गिकता जास्त आहे.
▪ गुळामुळे स्नायु बळकट होतात आणि शरीराला ऊर्जा मिळते.
▪ गुळामुळे थकवा जाणवत नाही.
▪ गुळ जर आल्याबरोबर खाल्ला तर सर्व प्रकारच्या हाडे दुखीपासून आराम मिळू शकतो.
▪ दूध आणि गूळ हा एक उत्तम पर्याय आहे. गुळात भरपूर प्रमाणात खनिज आहे.
▪ गुळात असलेल्या पोटॅशियममुळे शरीरातील चयापचय वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
▪ शरीराची पाणी वाचवून ठेवण्याची क्षमता गुळामुळे कमी होते आणि आपले वजन कमी होते. ▪ साधारण सर्दी खोकला झाल्याने गुळाच्या चहाने लगेच आराम मिळतो.
▪ सुंदर लांब केसांसाठी स्त्रियांनी गुळाचे सेवन आवश्य करावे.
▪ गुळाचे सेवन केल्याने त्वचाही उजळते. तसेच अंगावरील पुरळ, डाग नष्ट करण्यासाठी गूळ मदत करतो.
पण रसायनमुक्त आणि नैसर्गिक गूळच घ्यावा
पण जर आपल्याला मधुमेह किंवा अन्य आजार असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने गुळाचे सेवन करा.
- बशीर मुल्ला
मुख्यसंपादक