Homeमुक्त- व्यासपीठद्विधा मनस्थिती

द्विधा मनस्थिती

हो आणि नाही यामध्ये अडकून पडले…
मनाच्या दुविधेत निर्णय घेणे जड झाले…

चुकेल या भितीने नाही म्हटले
नाही ला ही मनाने नाही स्विकारले

हो म्हटले असते तर आयुष्य वेगळे असते
नाही म्हटले नसते तर आपले नाराज झाले असते

याच दुविधेत मी गुंतून पडले
हो आणि नाही यात अडकून पडले

निर्णय घेणे सहज सोपे होते
पण मनाने संभ्रम तयार केले

नाव गाजवले तर आपले तुटतील
धडपडले तर जगातले हसतील

याच दुविधेत मी गुंतून पडले
हो आणि नाही यात अडकून पडले…

कोणालाही फुरसत नाही पाहायला तुमच्याकडे
आपण आपल्याच कल्पनांना गृहीत पकडले

जग म्हणा की आपले हसले असते कि नुसते
पण आपल्याला ओळखायला आपलेच ताळतंत्र चुकले ,

याच दुविधेत मी गुंतून पडले
हो आणि नाही यात अडकून पडले…

कवयित्री – नेहा नितीन संखे
( बोईसर )

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular