Homeवैशिष्ट्येनतमस्तक गुरूचरणी

नतमस्तक गुरूचरणी

जीवनी शिक्षणाचा ,
पाया ज्यांनी रचिला.
अंधार तो अज्ञानाचा,
ज्ञानज्योतीने उजळला. १

संस्काराची बीजे रोवूनी,
नवविचारांचे रोपण करूनी.
नवविषयांचे अमोघ ज्ञान देवूनी,
वस्तुपाठ आदर्शांचा शिकवूनी.२

भावी पिढीला घडविणारे,
चैतंन्याशी ते जागविणारे.
कधी मीत्र सखा बनणारे,
जीवनपथ ते दाखविणारे. ३

परंपरा ती विद्वान गुरूजनांची,
ओळख अपुल्या संस्कृतीची,
गुरुशिष्यांच्या अतूट नात्याची,
भूमिका अपुली विश्वगुरूची. ४

शिक्षकदिनी संकल्प करू या,
एकनिष्ठ राहू या नितीमूल्यांशी.
ज्ञानाला जगण्याची जोड देवू या,
नतमस्तक होवू गुरूचरणांशी.५

शिक्षकदिनास माझ्या सर्व पूज्य व आदरणीय‌ गुरूजनांच्या चरणी माझे, काव्यपुष्प समर्पित

                     श्री रेवाशंकर वाघ ठाणे 
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular