Homeवैशिष्ट्येनागपंचमीचा इतिहास*

नागपंचमीचा इतिहास*

“पराक्रमी नागवंशीय राजे”

‘अंड्या’तून निघालेले साप व ‘गर्भा’तून जन्मलेले नाग अश्या प्रकारे ‘नाग’ या शब्दांचे दोन अर्थ होतात यावरून ‘नाग’ हा शब्ध विशिष्ट मानव समुदायाला उद्देशून करण्यात आला आहे हे स्पष्ट होते.

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर

नागपंचमीचा संबंध “नाग” या सरपटणा-या सापासी(सर्पा सी) नसून भारतात नाग हे “टोटेम” (प्रतिक) असणारे पाच पराक्रमी नाग-राजे•••
१• अनंत (शेष) नाग
२• नागराजा वासुकी
३• नागराजा तक्षक
४• नागराजा कर्कोटक आणि
५• नागराजा ऐरावत

ह्या पाच नागराजासी संबधित आहे. ह्या पाच ही नाग-राजांचे स्वतंत्र गणतांत्रिक (republican) स्वरुपाची राज्ये होती.

यामध्ये नागराजा अनंत हा सर्वात मोठा. जम्मू-काश्मीर मधील अनंतनाग हे शहर त्यांच्या स्मृतीची साक्ष पटवून देते.

त्यानंतर दुसरा नागराजा वासुकी नागराजा हा कैलास मानसरो पासून उत्तर प्रदेश क्षेत्राचा प्रमुख होता.

तिसरा नागराजा तक्षक यानेच जगप्रसिद्ध तक्षशिला विश्वविद्यापीठ स्थापन केले. येथेच प्लेटो, अँरीस्टॉटल सारखे तत्वज्ञ शिकून गेलेत.

चवथा नागराजा कर्कोटकाचे रावी नदीच्या शेजारील प्रदेशात राज्य होते.

पाचवा नागराजा ऐरावत (पिंगाला) भंडारा प्रांत आजही पिन्गालाई एरीया म्हणून ओळखला जातो.

ह्या पाच ही नागराजांच्या गणराज्याच्या सीमा ऐकमेकांच्या राज्याला लागून होत्या. पाच नागराजे मृत्यू पावल्या नंतर, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नागवंशीय लोक “नागराजे स्मृति अभिवादन” “नागपंचमी” म्हणून दरवर्षी साजरा करीत असत

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular