Homeकृषीपेरू पिकाची लागवड कशी करावी …!!

पेरू पिकाची लागवड कशी करावी …!!

पेरू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते हलक्‍या प्रतीची जमीन चांगली असते. लागवडीसाठी सरदार ही जात निवडावी. लागवडीसाठी 6 x 6 मीटर अंतरावर 60 x 60 x 60 सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत. चांगली माती, शेणखत आणि 1 किलो सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने खड्डे भरावेत. खड्ड्याच्या मध्यभागी कलमाची लागवड करून त्याला काठीचा आधार द्यावा. कलमांना पुरेसे पाणी द्यावे. आळ्यात आच्छादन करावे.

उत्पादन आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने पेरूझाडाची छाटणी, आकार देणे, वळण देणे इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत. काही वेळा झाडे फार वाढून त्यांची दाटी झालेली असते. अशा झाडांची बहरापूर्वी छाटणी करून प्रत्येक झाडाच्या वाढीस पुरेशी जागा मिळेल, अशा बेताने त्याचा आकार ठेवावा, त्यामुळे झाडावर नवीन फुटवा येऊन चांगले उत्पन्न येऊ शकते, तसेच बागेत सूर्यप्रकाश व हवा खेळती राहते, त्यामुळे फळांची प्रतवारी सुधारते व रोग-कीडदेखील कमी येते. छाटणी करताना जमिनीलगतच्या फांद्या छाटणेदेखील महत्त्वाचे आहे. कीड व रोगग्रस्त फांद्यांचादेखील बहर धरण्यापूर्वीच नायनाट करावा. फळमाशीच्या नियंत्रणासाठी बागेत प्रतिएकरी पाच रक्षक सापळे लावावेत.

“आशाच नवनवीन शेतीविषयक पोस्ट बघण्यासाठी व माहिती घेण्यासाठी Follow करा आपले हक्काची लिंक मराठी वेबसाईट “

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular