Homeघडामोडीपोलिसाची व्हाट्सअप स्टेटस सेट करून आत्महत्या.

पोलिसाची व्हाट्सअप स्टेटस सेट करून आत्महत्या.

गडहिंग्लज (प्रतिनिधी ) – कौटुंबिक वादातून एका पोलीस नाईक पदावर कार्यरत असणाऱ्या पोलिसाने आत्महत्या केल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. रामदास अशोक घस्ती (रा . बसर्गे ता – गडहिंग्लज ) असे त्यांचे नाव आहे.
आत्महत्येपूर्वी ‘मी चाललोय ‘ असे व्हाट्सअप ला स्टेटस ठेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. याबाबतची वर्दी कंचनकुमार बाबुराव घस्ती यांनी गडहिंग्लज पोलिस ठाण्यात दिली आहे.
घस्ती हे चंदगड पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर कार्यरत होते. घरगूती मतभेद असल्याने पत्नी व मुले माहेरी राहत होते. या सर्व कारणाने नेराश्यातून त्यांना दारूचे व्यसन लागले. त्यामुळे ते आपल्या पोलिसी कर्त्यव्याला न्याय देऊ शकत नव्हते.
त्यांनी राहत्या घरीच दोरीने गळफास घेतला आणि आपली जीवनयात्रा व्हाट्सअप च्या स्टेटस च्या बरोबरीने संपवली. त्यांनी सेट केलेल्या स्टेटस चा खरा अर्थ मित्रांना ही वाईट बातमी समजून झाला . अधिक तपास गडहिंग्लज पोलीस करत आहेत.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular