सत्य अहिंसेच्या बळावर
जो लढला अशी लढाई
नाही उचलले शस्त्र ना अस्त्र
केले शत्रूला त्रस्त…
त्याच्या होती लकब अंगी
आजही गौरव करी जमाना
कसा पळवलास फिरंगी….
ज्याला नव्हती कधी सत्तेची भूक
सत्य अहिंसेचा होता दूत
पारतंत्र्य ज्याला मंजूर नव्हतं
स्वतंत्र भारत ज्याचं स्वप्न होतं….
असा परम तपस्वी राष्ट्रपिता तो
सुकृत शिरोमनी तो
स्वावलंबी महान
ग्रामदृष्टी ,ग्रामहृदय
असा तो ग्रामप्राण….
चरखा खादीवाला
असा बापू होता महान
असा बापू होता महान….
शत: शत: नमन
-सौ.भाग्यश्री आपेगांवकर
ता.अंबेजोगाई
जि.बीड

मुख्यसंपादक