Homeमुक्त- व्यासपीठवृद्धावस्थेतील मानसिक समस्या

वृद्धावस्थेतील मानसिक समस्या

घालमेल मनाची

अहो , तुम्ही व्हा पुढे मी आलेच . आता काय झाले रेखा , नेहमी तुझे काय चालू असते हे ! मी घराला नीट कुलूप लावले.

गॅस , लाईट बंद केले आहेत . तुझ्या डोक्यात असे खुळ कुठून बसले , न काय देव जाणे . अग , निदान हॉस्पिटलमध्ये चेकअपला जाताना तरी अशा हजार शंका काढू नकोस . तू चल , आपण हॉस्पिटलमध्ये पोहचलो ना की मी शेजारच्या सुमित ला कॉल करून सांगतो , घराकडे लक्ष ठेव
म्हणून …हम्म ! रेखा उद्गारली . झाली बाई ही आता शांत , म्हणून विनायक रावांनी …पॅन्ट च्या खिशातील रुमाल काढून कपाळावर जमा झालेला घाम टिपला . सोसायटी गेट जवळ बसलेला वाँचमनला हे संवाद नेहमी ऐकायला मिळत . पटकन उभारून त्याने ह्या अंकलला नमस्कार केला . त्याच्या ही मनात कायम रेखाताई व विनायक सरांबद्दल करुणा दाटून येत असे . त्यांना जमेल तशी मदत करण्यासाठी सोसायटीतील सदस्य , आबालवृद्ध , मेड , वॉचमन पुढे असत .

http://linkmarathi.com/कोरोना-ओमीक्रॉन-आणि-कृष्/
 हा सगळा संवाद ऐकला , वृद्धांची मनाची घालमेल पाहिली की , सुरुवातीची एकत्र कुटुंब पद्धत , माणसांनी कायम भरलेली घरे आठवतात . जसजसे  व्यवसाय , नोकरीनिमित्त लोक विखुरले . विभक्त कुटुंब पद्धत उदयास आली तसे ह्या समस्या वाढत चालल्या आहेत . मोठ्या शहरात राहताना आर्थिक प्रॉब्लेम्समुळे फॅमिली प्लॅंनिंग ...सो घरटी एक किंवा दोन मुले ! प्रत्येकाची घरे लांब , कामाची धावपळ यामुळे साहजिकच फक्त विकएंड किंवा एखादा फंक्शन , सणवार निमित्त नातेवाईक , फ्रेंड सर्कल यांच्या भेटीगाठी . संपूर्ण आठवडाभर घाण्याला बैल जुंपल्यागत शहरात कष्ट करायचे आणि रविवारची सुट्टी एन्जॉय करायची असाच फंडा हल्ली रूढ होतोय . खरंतर माणूस प्राणी हा समाजप्रिय त्याला नेहमीच समूहात राहायला आवडते , पण हल्ली स्वतःची जीवनशैली त्याला आधुनिक कामाच्या स्वरूपानुसार बदलणे भाग पडले . आणि ह्यातूनच उद्भवतात वृद्धावस्थेतील मानसिक समस्या ....!

साधारणपणे हिंदू धर्मातील पारंपारिक रितीनुसार वयाच्या ५० नंतर माणूस वानप्रस्थाश्रमात प्रवेश करतो . वय ६० ते ६५ व त्या पुढील काळ हा वृद्धावस्था म्हणून ओळखला जातो . सध्याच्या आधुनिक काळात वैद्यकशास्त्र तील

लक्षणीय प्रगती , अद्ययावत औषधप्रणाली, अत्याधुनिक साधन सामुग्रीने सुसज्ज अशी हॉस्पिटल , यामुळे मृत्यूदरात बरीच घट झाली आहे आणि सर्वसामान्य आयुर्मानात वाढ झाली आहे . त्यामुळे वृद्धांची संख्या बरीच आहे . एकत्र कुटुंबीपद्धतीत वृद्धांना अन्न , वस्त्र , निवारा ह्याच बरोबर सुरक्षिततेची शाश्वती मिळत होती . परंतु आत्ताच्या विभक्त कुटुंबामध्ये आर्थिक सुबत्ता भरपूर असूनही सुरक्षिततेचा अभाव जाणवतो . त्यातून आरामशीर चंगळवादी संस्कृती ह्यामुळे वृद्धांची मानसिक समस्या बिकट होत चालली आहे .

तरुणाईपुढे उभी असलेली आव्हाने पेलताना त्यांची प्रचंड दमछाक होतेय ! एकेकाळी अतिशय कष्टाने वाढविलेल्या आपल्या एकुलत्या एका मुलाकडे मोठ्या आशेने पाहिले जाते . पण ह्या तरुणांना कामावरून घरी परतताच आपल्या आई वडिलांना द्यायला वेळही अपुरा पडतोय .  त्यातूनच आपले मूल जाणूनबुजून आपल्याकडे  दुर्लक्ष करतोय ही मनाला लागलेली बोच ! प्रगत अशा ज्ञानांमुळे दोन पिढीतील जनरेशन गॅप यामुळे नात्यात मोठी दरी उभी राहते . परंतु ह्यात ना तरुणाईला दोष देता येत  ना वृद्धांना ! ...

अर्थात सगळीकडेच अशी परिस्थिती उद्भवत नाही , अपवादानेच एखादे दुसरे उदाहरण !

असे म्हणतात की खुर्ची आहे तो पर्यंत समाजात  मान मरातब मिळतो . एकदा तुम्ही सेवानिवृत्ती पत्करली की तुमचे उत्पन्न जवळपास निम्म्याने घटते . आपल्या भारतात  निवृत्तीचे हे वय 

५५ ते ६० वर्षे तर अमेरिका व इतर देशात ते ६५ वर्षे आहे . नोकरीत असताना आपल्या हातून घडणारे कार्यसमाधान , उत्साह वेगळाच ! हेच एकदा रिटायर झाले की वेळ भरपूर असूनही दैनंदिन जीवनक्रमात झालेला बदल असहाय्य होतो . अर्थात तुम्हाला समाजकार्य , एखादे छंद , वाचन संस्कृती , पर्यटन करमणुकीची साधने ह्यात रस असेल तर ह्या निवृत्ती कालावधीत ही तुमचा वेळ मस्त जातो .

परंतु आर्थिक उत्पन्न घट व रिकाम्या वेळेचा उपभोग घेताना जर तुम्ही असमर्थता दाखवत असाल तर मात्र वृद्धांचा मानसिक ताणतणाव वाढत जाऊन त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर जाणवतो .

भारत हा कृषिप्रधान देश आहे . जर तुमच्याकडे काही प्रमाणात शेत जमीन असेल तर तुमचा अनुभव कुटुंबप्रमुख या नात्याने पुढच्या पिढीला होतो . आपले ज्ञान दुसर्यांना दिल्याने वाढते . माणसाने मरेपर्यंत विद्यार्थी दशेत राहून कार्यरत राहिले तर मानसिक समस्या अशा उद्भवणारच नाहीत . सतत नवीन काहीतरी शिकण्याची , स्वीकारण्याची आस मनाला असावी लागते . इतकेच काय वृद्ध , ज्येष्ठ व्यक्तींचा प्रदीर्घ अनुभव राजकारणासारख्या क्षेत्रात ही उपयुक्त मानला जातो . वृद्ध जरी असलो तरी जोश तारुण्याचा हे एकदा मनावर बिंबवले तरी तुमच्या चेहऱ्यावर झळकते हास्य आपोआप उमटते . तुम्ही स्वतःच जर वृद्ध , असहाय्य असल्याचा बाऊ केला तर समाजापासून अलगीकरण होऊ शकते व ही समस्या गंभीर रूप धारण करते . हल्लीच्या काळात वृद्ध माणसे नातलग , मुलेबाळे यांच्यापासून तुटत व अलग होत चालली आहेत …ह्याला ही अनेक कारणे आहेत . आणि ह्याच प्रसंगातून रेखा व विनायकराव जात आहेत.

रेखाताई स्वतः एक टीचर होत्या . विनायक राव ही क्लास वन ऑफिसर पदावरून रिटायर झालेले गृहस्थ ! आपल्या एकुलत्या एका मुलाला लाडाकोडात पण शिस्तीत  वाढवून , शिकवून मोठे करून उच्च

शिक्षणासाठी US ला पाठविले . कालांतराने करिअर चा ध्यास , परदेशी नोकरीची संधी हातची कशी घालवणार , तिकडेच स्थायिक झालेला त्यांचा मुलगा यश…. नावाप्रमाणेच त्याचा यशाचा आलेख वाढता….! मुलाच्या हुशारीचा सार्थ अभिमान ह्या दाम्पत्याच्या चेहऱ्यावरून कायम ओसंडून वहात असतो .

परंतु जसजसे वय वाढत चालले तसतसे मात्र वाढत्या वयाची चिंता वगैेरेनी ह्यांच्या मनात घर केले .

 वर्षातून काही महिने ही दोघे मुलाकडे जातात

परंतु आपल्या मातृभूमीची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नाही . तसेच सुनबाई , मुलगा कायम धावपळीत , नातू छोटा होता तोपर्यंत ह्यांचे
मन तिकडे छान रमत होते . पण तो मोठा होऊन शाळेत रमला . घरी ह्या दोघांना वेळ खायला उठत असे . पाश्चात्य संस्कृतीची जुळवून घेणे ह्यांना अवघड जात होते . म्हणूनच काही दिवस तिकडे तर काही दिवस इकडे अशी त्यांची पंढरपुरी वारी . पण इथे भारतात आल्यावर मात्र हे वृद्ध जोडपे शांत बसत असतील तर ना ! अखंड मुलाचा , नातवाचा ध्यास . राहायला भारतात
मन मात्र परदेशात अशी द्विधा अवस्थेत रेखाताई कायम अडकून पडत . त्यातूनच हल्ली त्यांना सतत काहीतरी चुकत असल्याचा , निसटून गेल्याचा भास होई . म्हणूनच घराबाहेर पडताना त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते . स्त्रियांच्या मानाने पुरुष मनाने स्ट्रॉंग असतात . आज आपण समाजात पाहतो , कित्येक जोडपी अशी आहेत की , हयातभर बायकोने घरदार संसार समर्थपणे पेललेला असतो , पण म्हातारपणी मात्र नवऱ्याला तिला आधार द्यायची वेळ येते , का तर ती स्त्री आपल्या घर , कुटुंब ह्या कोशातून सहजगत्या बाहेर पडत नाही .

http://linkmarathi.com/gif-म्हणजे-काय/

तर मंडळी ह्या लेखामधून सांगण्याचा उद्देश एवढाच की , जेवढा तुम्ही वृद्धावस्थेचा बाऊ कराल तेवढ्या तुमच्यासमोर समस्या उभ्या राहतील . त्याचे रूपांतर नैराश्येत होते . आजकाल देशविदेशात नैराश्य ( डिप्रेशन ) वाढल्यामुळे वृद्धांच्या आत्महत्येचे प्रमाण ही वाढले आहे . म्हणूनच वृद्ध व्यक्तींकडे एखादं लहान मूल समजून लक्ष द्यायला हवे . मानवाच्या आयुष्याचे चार टप्पे म्हणजे बालपण , तारुण्य
प्रौढत्व व वृद्धावस्था !
वृद्धांच्या या समस्येच्या अभ्यासाला जेराँटाँलाँजी
असे म्हणतात .

अशी ही वृद्धावस्था आनंददायी वाटावी ह्या साठी भविष्यात काही ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे . वृद्धांनी डॉक्टरी सल्ल्यानुसार पथ्यपाणी पाळून शारीरिक व मानसिक स्थिती उत्तम ठेवावी .
गरजेनुसार मृत्यूपत्र तयार करून ठेवावे . थोडक्यात पण योग्य असे …. म्हातारपण अडगळ बनून न राहता आपल्या मुलाबाळांना जशी जमेल तशी आर्थिक मदत करावी कारण त्यामुळे कुटुंबात कायमच आनंदी वातावरण राहून जिव्हाळा
निर्माण होईल .

शेवटी काय माणूस जन्मत:च रिकाम्या हाताने येतो . अंतिम क्षणी ही त्याला रित्या हातानेच जावे लागते . म्हणूनच मी ...माझे हा अट्टाहास सोडून द्यावा ....!

©️®️सौ राजश्री भावार्थी
पुणे

https://surveyheart.com/form/615fcb6ec182fe215fb90303

नवोदित लेखक व कवींच्या सुद्धा इतरत्र प्रसिद्ध न झालेल्या कविता स्वीकारल्या जातील. गुगल फॉर्म भरावा आमचे प्रतिनिधी आपणास संपर्क साधतील

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular