अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना कधीच थरथरु नयेत ओठ.खर आणि वास्तवावर व्यक्त व्हायला लेखनीतील शाही कधीच न आटावी .का तर? जे भोगतो,बधतो अनूभवतो ज्या गोष्टी मनाला वेदना देतात, जेंव्हा जेंव्हा मण अस्वस्थ होत तेंव्हा ते विचार त्या भावना कधीच दाबू नयेत तर ज्या तिव्रतेने आपल्याला बेचैन करतात त्याच तिव्रत्तेने त्या अंतर्मनातील ज्वाला शिलगू द्याव्यात. यामुळे आत बाहेर पसरलेला बराचसा अंधःकार सरून उजेडाचा मार्ग प्रकाशित प्रशस्त होतच असतो. ज्या गोष्टींत मन रमते, एखाद्या विषयासंबंधी मनात प्रचंड कुतूहल निर्माण होते त्यातील बारकावे टिपताना मनाला मिळनारा आनंद, नवं जाणून घेण्यासाठी होणारी मणाची घालमेल अन् या साठी आपण किती वेळ देतो याला खूप महत्त्व आहे. कारण ज्या गोष्टी कडे आपला स्वभावीक पणे कल असतो आणि ईतर काही करण्याच्या भानगडीत त्याच जर हातातून निसटून गेल्यातर ,”संगीताविना गाण्याची मैफिल” असेच म्हणावे लागेल. तस तर मला कथा, कविता,नाटके लिहीण्याचा छंद.व्यस्त जिवणक्रमातूण मिळालेल्या फावल्या वेळात इकडे तिकडे रमण्या पेक्षा मी पूस्तकातच जास्त रमतो, वाचण वेडा बरोबर मेंदूचा गाभाराही नेहमीच विविध विचार प्रवाहात खळाळत असतो. सत्य असत्य याच मणात होणारं द्वंद्व नेहमीच नव्या विचाराला प्रसवत असते. त्यातल्या त्यात संत साहित्यातील वारकरी संप्रदायास अभिप्रेत असनारा नवा विचार अथवा विद्रोह माझ्या अंगीकृत यावा, म्हणजेच सत्य असत्याशी मत केले ग्वाही ह्या तूकोबा रायांच्या उक्ती प्रमाणे जे घ्यायचे वा द्यायचे ते चिकीत्सा करून पारखूनच आत्मसात करणे स्वीकारणं हा स्वभावच झालाय.
विद्रोही असन, विचार पूरोगामी आहेत म्हणजे
नास्तीकच असावं असही नाही मी मात्र थोडा नास्तीक थोडा आस्तीक आहे. मंदीरातील मूर्त्यांमध्ये देव वास करतोच असही माझ मतं नाही. मात्र मी मंदीर आणि त्या परीसरात रमतो तिथे काही वेळ घालवण्याने मनाला जी उर्जा प्राप्त होते जी अनूभूती मिळते ती वेगळीच. तिथे नेहमीच जातो बसतो कधी हात जोडतो कधी जोडतही नाही. मी या विस्वात ईश्वराच अस्तीत्व आहेच ह्या विचारांचा आहे. मात्र त्या बद्दल ज्या धारना समाजात रूढ आहेत त्या सर्वच मला मान्य आहेत असेही नाही. आपण ज्या ईश्वराला मानतो त्याचे पूजन अभिषेक एखाद्या विशिष्ट समाजातील व्यक्तिकडूनच करावा या धारनेला मात्र मी विरोध करतो. ईश्वर आणी भक्त यांच्यातील भावनीक, अंतरीक जे नात जी श्रद्धा असते जों या द्रष्य वा अद्रष्य संकल्पनेतील आत्मीक संवाद होतो तिथे कोना (भटा बाम्हनाची) दलाल मध्यास्ताची गरजच भासू नये या विचांरांचा मी आहे.
असत्याची चिरफाड, सत्याच समर्थन करत असताना
माझा विद्रोह माझ पूरोगामीपण बेगडी ठरु नये.
देव धर्मावर श्रद्धा असणार्याने चिकीत्सक पण विवेकपूर्ण दंभावर वार करतांना कूठे ही धार कमी होवू देता कामा नये.
वाईट चालीरिती अन् अंधश्रद्धेवर प्रहार करतांना दूजाभाव बाळगणे मला मान्य नाही. आपलं ते बाळू अन् दूसर्याच म्हणजे कारट् हा कोता विचार मनाला कधीच पटत नाही.आपल ठेवायच झाकून अन् दूसर्याच बघायचं वाकून हा बूसटलेला बेगडीपणा कधीच स्वता:लाच काय कोन्हालाच पटणार नाही. दूसर्याच्या चूलीत मूंडक घालून तोंड काळं करण्या पेक्षा आपलाच भवताल आधी प्रकाशमान असावा या विचारांचा मात्र मी आहे.
जगन्नाथ काकडे
मेसखेडकर

मुख्यसंपादक