Homeमुक्त- व्यासपीठस्वतःचे आयुष्य जाळून दुसऱ्यांच्या अंधारल्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारी बाई म्हणजे प्रतिभाताई

स्वतःचे आयुष्य जाळून दुसऱ्यांच्या अंधारल्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारी बाई म्हणजे प्रतिभाताई

लढुंगी नही तो जितुंगी कैसे ?
संघर्ष की वारीस हू ….
रूकुंगी कैसे
जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद
ताई आपणास वाढदिवसाच्या आभाळ भरून शुभेच्छा, खरं म्हणजे आभाळाएवढ आपलं काम ,आणि आपल्या विचारांच्या कक्षा रुंदावलेल्या सागरा इतक्याच, अशिक्षित गरिबीने पिचलेल्या आदिवासी बांधवांसाठी आपण केलेले कार्य जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत लोकांच्या स्मरणात राहील. यापुढेही जाऊन आपण शेतकऱ्यांसाठी, दीनदुबळ्यांसाठी, ओबीसींसाठी ,करत असलेलं काम फार मोलाचं व शाश्वत अस आहे, एक बाई काय करू शकते हे समाजाला आपण दाखवून दिले, आपल्या लोकसंघर्ष मोर्चा च्या माध्यमातून अनेक प्रश्नना वाचा फोडून गोरगरिबांना न्याय मिळवून दिला. आपण फिरत असलेल्या आदिवासींच्या पाड्यावर जायला रस्ता नाही, राहिला नीटसं घर नाही प्रचंड अडचणी तरी आपण काम करत राहिला ,आणि आज ही त्याच ताकदीने काम करत आहात. खरं म्हणजे आपण मेघा ताईच्या खांद्याला खांदा लावून ही काम केलं आहे. न्याय हक्कासाठी लढता लढता स्वतःच्या जीवाची पर्वा ही कधीच केली नाही आपलं घरदार संसार सगळ्याच गोष्टींवर आपण तुळशी पत्र ठेवलं, आणि दीनदुबळ्या शेतकरी आदिवासी यांच्या हक्कांसाठी संपूर्ण जीवन समर्पित केलं. ताई साहेब आपणा सारख्या थोर विभूतींना मी पामर काय शुभेच्छा देईन आपलं शारीरिक-मानसिक सामाजिक आरोग्य चांगले राहो हीच शुभेच्छा
जिंदाबाद जिंदाबाद

         संतोषपाटील
       7666447112
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular