पु.ल.नेहमी म्हणायचे ,
जवळजवळ निम्मा महाराष्ट्र 1 जून ला जन्माला आला आहे आणि तो ही गुरुजींच्या पुण्याईमुळे…
सर्व कष्ट आणि कटकटीमधून वेळ मिळाल्यावर मुलाला गावातील मराठी शाळेत हात धरून पायी चालत घेऊन जाउन शाळेत गुरूजी समोर उभे केल्यानंतर शाळाप्रवेश होई
मुलाला शाळेत दाखल करण्यासाठी वय वर्ष ६ पूर्ण असावे लागते त्यामुळे पालकांनी सांगायचे अंदाजे व गुरुजींनी ठोकताळे ठरवून जन्म तारीख अशी टाकायची की त्याला जून मध्ये ६ वर्ष पूर्ण होतील.
आज रोजी गुरूजींच्या लेखणीमुळे बर्याच जणांचे कागदोपत्री वाढदिवस. आहेत
गुरूजनांच्या कृपेने शाळेत दाखल करतात तोच दिवस जन्म दिनांक टाकून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचा शिक्षणाचा महायज्ञ सुरू.
१९७५ च्या आधी निरक्षरता जास्त होती. त्यावेळी बहुतांश पालकांना आपल्या पाल्याची जन्मतारीख माहीत नसायची. मात्र साल माहित असायचे. गुरुजींनी शाळा प्रवेशाच्या वेळी संबंधित पालकांना पाल्याची जन्मतारीख विचारल्यावर मात्र हे पालक गोंधळायचे.
निदान वर्ष माहित आहे का असे विचारल्यावर पालक वर्ष सांगत असत. मग त्याच वेळी गुरुजी आपल्या सोयी नुसार १ जून ही जन्म तारीख निश्चित करायचे.
अशा पद्धतीने अनेकांच्या जन्मतारखांचा जन्म झालेला आहे.
अशा पद्धतीने आज ज्या कोणाचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!!
गुरुजी व निसर्ग या दोघांचा ताळमेळ राखत आज रोजी आपण या भूतलावर स्वताची ओळख घेऊन आलात….. व आपल्या कार्यातून…. ओळख प्राप्त करून दिली त्याबद्दल…. मनापासून…. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….
तुम जिओ सालो साल…… साल के दिन हो पचास हजार……
सो- सोशल मीडिया
मुख्यसंपादक