तो कुठे जुमानतोय
पाठीवर मारल्या फत्तरांना
शोधत फिरतोय
आयुष्यास ग्रासलेल्या
प्रश्नांच्या उत्तरांना
▪️
व्यवस्थेच्या हातात खुंटा असलेल्या
भरडग्यात
भरडला जातोय तो
कधी जाड तर कधी बारीक
दळला जातोय तो
▪️
कित्येक वर्षाचा भोगून वनवास
अजूनही तो जगतोय कसा
नांगराचा फाळ मातीत
झिजून जावा तसा
▪️
तिष्ठतच राहतोय तो न्यायासाठी
स्वातंत्र्यात जगतांना
कसा मिळेल न्याय
किक्रेटच्या चेंडूवर आणि
नेत्याच्या भाषणावर
टाळ्या वाजवणाऱ्या अवलादी
पोटी असतांना
▪️
कसे मिळतील उत्तरे?
प्रश्नच माहित नसलेल्या माणसांना
साधे पाखरूही शिवत नाही
दाणे नसलेल्या कणसांना
संतोष पाटील
▪️▪️▪️
मुख्यसंपादक
[…] || दाणे नसलेल्या कणसांना || […]