अजिंक्य सावंत – दारावरची बेल वाजली……काव्या मी आलोय…..
चार वर्षाची चिमुकली बाबांच्या आवाजाने धावतच आली आणि समोर आपले बाबा दिसल्यावर डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहवत बाबांना बिलगायला पुढे सरसावली, आपल्याला आता खूप चॉकलेट्स आणि खाऊ मिळणार या आशेने बाबाला बिलगून त्याच्याकडे एक टक पाहू लागली….
अजिंक्य सावंत आपल्या घरात मुलगी आणि पत्नी बरोबर दुपारचे जेवण करत होता, तीन वर्षाची त्याची मुलगी काव्या त्याला आपल्या हाताने एक एक घास भरवत होती, अजिंक्यची पत्नी सुमन हे बाप लेकीचं ओसंडून वाहणारं प्रेम आपल्या डोळ्यांत आणि मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवत होती.
अरे बाळा बस झालं ना आता माझा पोटू भरला बघ….
आपल्या पोटावर हात फिरवत अजिंक्य लेकीला म्हणाला….
“बाबा तू गेल्यास की येते नही लवकर आता खाऊन घे मी भरवतीय ना” – लेकीचे हे बोबडे बोल ऐकून त्याच्या डोळ्यांतून आसवे आली पण त्याने ती आसवे एका आवंढ्यातंच गिळली आणि परत प्रेमाने लेकीने भरवलेले घास खाऊ लागला…..
इतक्यात घरातला लँडलाईन खणखणला…….Tring Tring Tring Tring …..
सुमन तशीच उठली आणि फोन उचलला – हॅलो….
“नमस्कार – भाभीजी मैं ब्रिगेडियर प्रताप सिंग बोल रहा हूं, अजिंक्य से बात करनी है, अर्जंट है.”
सुमन ने अजिंक्य कडे बघितले आणि त्याला खूण केली तुमचा फोन आहे…..
हॅलो…अजिंक्य बोलतोय….
अजिंक्य आपको अभी इसी वक्त निकलना होगा यहा जंग छेड जा चुकी है….
ठीक है साहब मैं अभी निकलता हूं….
अजिंक्यने फोन ठेवला आणि सुमन ला म्हणाला, अगं सुमन मला लगेच निघावं लागेल ब्रिगेडियर म्हणाले तिकडे युद्ध चालू झालं आहे….
अरे आताच मी पाहत असलेले समोरचे चित्र स्वप्न तर न्हवते ना असा विचार सुमनच्या मनात येऊन गेला…..
अहो पंधरा दिवस पण नाही झालेत तुम्ही येऊन आणि पुन्हा तुम्ही लगेच निघालातही….काव्या बघा कशी बघतेय तुमच्याकडे…
सुमन आम्हा जवानांना सर्वप्रथम भारत देश जिला आम्ही आमची आई मानतो आणि नंतर परिवार….हे मी तुला आपल्या लग्नाच्या वेळीही म्हणालो होतो आठवतंय ना….
हो सगळं आठवतंय पण…
अजिंक्य तीचं ऐकत आणि एक नजर आपल्या लेकीकडे बघत घरातल्याच वरच्या माळ्यावर शिडीने चढत, बॅग भरायला निघून गेला…
सुमनला काहीच कळत न्हवते काहीच सुचत न्हवते…यांना अडवायचं तरी कसं…
नाही… …..
ते म्हणतायत ते खरंच आहे आज आम्ही इथे सुरक्षित आहोत भारताची जनता सुरक्षित आहे, ती या सैनिकांमुळेच ……..
आपला नवरा आपल्यासाठी लाखमोलाचा आहेच, पण त्याच्यासाठी भारत माता आणि भारत देशाची जनता लाखमोलाची आहे….
अजिंक्य तोपर्यंत बॅग भरून खाली उतरला , आई-बाबांच्या फोटोला हात जोडून नमस्कार केला आणि लेकीला उचलून घेऊन, बाबा लवकर येईल हं……असं लाडिकपणे तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाला आणि तिला पुन्हा अलगद सुमनकडे दिले……
सुमनने आपले भरलेले डोळे पुसले नि, एका हातात काव्याला धरून एका हाताने त्याच्या छातीवर डोके ठेवून त्याला मिठी मारली……
अजिंक्यही थोडा पत्नी आणि लेकीच्या तोंडाकडे बघून गहिवरला आणि दोघींना त्यानेही मिठी मारली……..
घराच्या गेटपर्यंत सुमन आणि काव्या अजिंक्यला सोडायला बाहेर आल्या होत्या, इतक्यात अजिंक्यची आर्मीची गाडीही दरवाज्यात त्याला पिकअप करायला येऊन उभी राहिली.
अजिंक्य ताठ मानेने गाडीत जाऊन बसला, पण शेवटी तोही माणूस आहे त्यालाही भावना आहेत, त्यालाही थोडं राहवलं नाही, त्याने एक नजर सुमनकडे पाहिलं आणि काव्याकडे बघून हसरा चेहरा करून त्यांना हात दाखवून पुन्हा वळून गाडीत बसला…..
सिंग साहेब चला आपली गाडी आता जाऊद्या…
गाडी जशी पुढे जात होती तशी सुमन हात हलवून अजिंक्यला टाटा करत होती पण तिला माहीत होतं आपला नवरा आता भारत मातेचे रक्षण करण्यास जात आहे आता तो मागे वळून पाहणार नाही, माझ्या डोळ्यातले अश्रू त्याला पाहवणार नाहीत.
काव्याने बाबा गेले म्हणून रडून रडून घर डोक्यावर घेतले होते, इवलीशी चिमुरडी पण तिला जाणवत होतं आपले बाबा कुठेतरी जात आहेत……
सुमनने तिला बाबांनी आणलेली चॉकलेट्स दिली आणि कसे तरी शांत केले ……
सुमन एकटीच बसून अजिंक्य आल्या पासूनचे दिवस आठवत त्यातच हरवून गेली…..
साहब मैं एक बात आपको पुछ सकता हूं क्या ?
अमरजीत सिंग अजिंक्यला म्हणाले……
हा बोलो ना साहब ……
अजिंक्य ने उत्तर दिले…..
कसं आहे ना- साहब मैं भी मेरे घर से निकल रहा था ना, तब मेरे भी घरवाले ऐसें ही रोने लगे थे….
बरोबर आहे हो साहेब – अपने लोग अपनेको ज्यादा चाहते है ना इसलीये ऐसें होता है, लेकीन हम भारत माँ के बेटे है ये अकसर यह लोग भूल जाते है…..
अभी आप बराबर बोले साहब…..अमरजीत सिंग म्हणाले….
सिंग साहेबांनी गाडी वेगातच चालवत आणली ती थेट हवाई अड्ड्यावरच……..
अजिंक्यला ताबडतोब बोलवून घेतल्यामुळे ब्रिगेडियर प्रताप सिंग यांनी त्याची आर्मी ऑफिस मधून विमानाच्या तिकीटची व्यवस्था लागलीच करून ठेवली होती, त्यामुळे त्याला हवाई अड्ड्यावर जास्त वेळ लागला नाही….
विमानात बसल्यावर त्यालाही घरी असतानाच्या गमतीशीर गोष्टी आठवू लागल्या होत्या, लाडकी लेक रोज सकाळी त्याच्या आधी उठून, त्याच्या तोंडावरून आपले इवले-इवलेशे पिटुकले हात फिवून त्याला, बाबा-बाबा हाक मारून उठवत असे, पत्नी कधी कधी आवाज देऊन नाही जाग आली तर, हातातल्या ग्लासमधले पाणी शिंपडायची, लेकीचा तो रडण्याचा आवाज, आणि अगदी निघतानाच घास भरवताना बोललेले तिचे बोबडे बोल….
सगळं सगळं आठवत होतं त्याला आणि त्याच्या डोळ्यातून आपसूकच अश्रुंचे दोन थेंब कधी गालावर ओघळले त्यालाही कळले नाही…..
स्वतःला सावरून बसत त्याने बाजूच्या अमरजीत सिंग यांच्याकडे एक नजर फिरवली, ते कुठलंतरी पुस्तक वाचण्यात गुंग झाले होते…..
एकदाचे विमान उतरले आणि अजिंक्य नि अमरजीत सिंग आपले सामान घेऊन गेटवर आले तोच खुद्द…..
प्रताप सिंग आणि त्यांचे सहकारी विजय राठोड अंजिक्य च्या स्वागताला स्वतः हजर झाले….
सर्वजण मिळून लागलीच ऑफिस साठी रवाना झाले….ऑफिस ला पोहचल्यावर प्रताप सिंग म्हणाले मेजर अजिंक्य “आपके उपर बहोत बडी जिम्मेदारी देनी है”….
“सर यह मेजर अजिंक्य, जिम्मेदारी से ना कभी पिछे हटता है और ना ही कभी हटेगा.”…
हसूनच पण आर्मीच्या खडया आवाजात अजिंक्य बोलला….
ठीक है चलो अंदर जाके बात करते है……प्रताप सिंग
दोघांशी हात मिळवणी करून अजिंक्य, अमरजीत, प्रताप सिंग आणि त्यांचे सहकारी विजय राठोड आपल्या केबिन मध्ये गेले, अजिंक्यला बसायला सांगून प्रताप सिंग दुसऱ्या खोलीत जाऊन आर्मी चा ड्रेस अंगावर चढवूनच बाहेर आले….
अजिंक्य आणि बाकीचे सगळे उठून ताठ उभे राहिले,……
बैठो आप लोग – तसे सगळे तिथेच खाली पुन्हा बसले…..
अजिंक्य आपको इसलीये बुलाया गया है, ताकी यहापर जंग चल रही है, और हमने जो टीम बनाई है उस टीम को आप हँडल करोगे…
ठीक है सर….
इतक्यात प्रताप सिंग यांनी निवडलेली 32 जणांची टीम तिथेच हजर झाली….
अजिंक्य तुम्हाला आताच इथूनच युद्ध पातळीवर जावे लागेल..
विजय राठोड आपल्या खणखणीत आवाजात म्हणाले…
येस सर….अजिंक्य म्हणाला
अमरजीत आणि अजिंक्य आर्मीचा ड्रेस घालायला ऑफिस च्या मागच्या बाजूला असलेल्या त्यांच्या रूम मध्ये आले….
अगदी तेराव्या मिनिटाला अमरजीत आणि अजिंक्य पुन्हा ऑफिस मध्ये हजर झाले….
अजिंक्य आप टीम को लेके पॉईंट पे जाओ….
प्रताप सिंग यांनी ऑर्डर देताच टीम ला घेऊन अजिंक्य सरळ त्या युद्धपातळीवर हजर झाला….
खूप वेळ झाला सोमोरून शत्रूंची काहीच हालचाल नव्हती, अमरजीत सिंग सोळा जणांना घेऊन दुसऱ्या पॉईंट वर डाव्या बाजूला त्याला दिसत होते, त्यांच्या अगदी समोरच दोनशे मीटरवर शत्रू स्वतःचा तंबू टाकून बसले होते, अजिंक्यच्या उजव्या बाजूला वीस फुटांवर त्याची टीम पोझिशन मध्ये तयार होती, अजिंक्यने अमरजीत आणि आपल्या सोळा जणांच्या टीम ला एकसाथ फायरिंग करायला सांगितले, ऑर्डर ऐकताच बंदुकीतून सुटणाऱ्या गोळ्यांचा जणू वर्षावच शत्रूंच्या छावणीवर होऊ लागला….
पण शत्रूंची मजलही काही कमी न्हवती त्यांच्याकडे असलेले बाँब आणि गोळ्यांचा वर्षाव ते अजिंक्यच्या टीमवर करू लागले, त्याच्या टीम मधले दोन जवान शाहिद झाले होते, अमरजीत अजिंक्यला आणि त्याच्या टीम ला वेळोवेळी कव्हर करत होते, शत्रूंची छावणीने आता इकडून फेकलेल्या दारूगोळ्यामुळे पेट घेतला होता, त्यातच अमरजीत यांच्या टीम मधून तीन जवान पुढे पुढे जाऊन शत्रूंचा खात्मा करत होते;
समोरून शत्रूंचे दोन जवान धावत येत असलेले अजिंक्यला दिसले आणि त्याने एका हाताने टीमला त्याला कव्हर द्यायला सांगून उठला तो हातात रायफल घेऊनच, आणि समोरच्या दिशेने रोखत अगदी बरोबर शत्रूच्या मधोमध कापळावरच निशाणा साधला आणि शत्रूला यमसदनी पाठवला….
शत्रूचा दुसरा जवान टीम कडे वळला तोच पुन्हा तसाच खाली पडून अजिंक्यने त्याच्या उजव्या पायावर एक गोळी झाडली तसा तो खाली बसला, लागलीच अजिंक्यने डोक्यात झाडलेली दुसरी गोळी आरपार निघून गेली – शत्रू तिथेच खाली झोपला…..
तिकडून अमरजीत समोरूनच शत्रूवर हल्ला चढवत होते पण अचानक समोरून बॉम्ब फेकला गेला, तो बॉम्ब अजिंक्यने बघितला आणि आपल्यातली सर्व शक्ती एकवटून तो अमरजीत यांच्याकडे धावू लागला, त्यांना काहीच कळत नव्हते हा आपल्याकडे एवढ्या वेगात का धावत येतोय, तो बॉम्ब खाली पडायच्या आत त्याने तो वरच्यावर आपल्या उजव्या हाताने पूर्ण ताकदीनिशी उडवला……..
पण……..
पण……… त्याच्या हाताचा फटका जेव्हा जोरात त्या बॉम्बवर लागला तेव्हा त्याची पिन निघाली आणि बॉम्ब फुटला आणि लांब जाऊन पडला, पण बॉम्ब फुटताना त्याचा उजवा हात पूर्ण रक्ताने माखला आणि अजिंक्य दूरवर फेकला गेला…..कसला तरी तुकडा त्याच्या डोक्याला लागला आणि तो कोसळलाच……
त्या अवस्थेतही तो तसाच उठून उभा राहिला, उजव्या हाताच्या खांद्याला रायफल लावली, डाव्या हाताचे बोट ट्रीगरवर ठेवले आणि बॉम्ब फेकणाऱ्याच्या दिशेने रायफल रोखली – क्षणाचाही विलंब न करता त्याने अचूक नेम धरून गोळ्यांचा भडिमार करत त्याच्या छातीची चाळनच केली……
अमरजीत हे सगळं पाहत होते तेही लगेच उठून त्याच्याकडे धावले परंतु ते पोहचण्या आधीच अजिंक्य जमिनीवर कोसळला….
एक शूर, पराक्रमी, कधीही हार न मानणारा आणि शत्रूला टिपून टिपून मारणारा आपला जिवलग मित्र असा पडलेला बघून त्यांचं रक्त “तानाजी मालुसरेंचे भाऊ सूर्याजिंसारखे” खवळले, मेरे दोस्त को जखमी किया **** लोग,
एवढे डोळ्यांत आग ओकून बोलले आणि लगेच आपल्या टीमला सांगून “याला इथून उचला आणि घेऊन जा” असे सांगून शत्रूकडे वळले, आणि रायफल मधून गोळ्यांचा भडिमार आणि बाँब चा वर्षाव करत, पूर्ण टीम बरोबर घेऊन शत्रूला नेस्तनाबूत केले…..
प्रताप सिंग आणि विजय राठोड हॉस्पिटल मध्ये अजिंक्यला बघायला आले, त्याच्या बाजूला बसलेले अमरजीत सिंग उठून उभे राहिले एक सॅल्युट केला……
बैठो बैठो अमरजीत – राठोड साहेब म्हणाले
साहब – बहोत अच्छा सबक सीखाया साहब ने दुश्मनोको, मेरी जान बचाने के लिये भागे और ऐसें हो गया साहब…..
आप उसके जिगरी दोस्त हो इसलीये……प्रताप सिंग म्हणाले
अजिंक्य सात महिने झाले तरी शुद्धीत येत नव्हता काय करावे डॉक्टरांना ही कळत नव्हते……..
त्याच्या डोक्यात घुसलेला अनुकुचीदार एक दगडाचा तुकडा काढून टाकण्यात आला होता, पण हात मात्र कोपरापासून खाली कापावा लागला होता…..
एक दिवस प्रताप सिंग आणि अमरजीत हॉस्पिटल मधेच असताना डॉक्टर धावत धावत त्यांच्याकडे आले आणि ………
सर …सर…अजिंक्य को होश आया है, आप चलो….
पळतच सगळे अजिंक्य जवळ आले……
सर्वांनी निःश्वास सोडला आणि त्याच्या बाजूला गेले…..
क्या यार कितना तरसायेगा दोस्त को……प्रताप सिंग
चल अभि जलदी ठीक हो जाओ घर जाना है……अमरजीत म्हणाले..
डोळ्यांनीच दोघांशीही अजिंक्य बोलला…..
तेवढ्यात डॉक्टर म्हणाले…..हं हं, अभि नहीं दो महिना इनको अंडर ऑब्झर्वेशन रखना होगा तभि घर जा सकते है…..
दोन महिन्यांनी अजिंक्य पूर्ण बरा झाला होता…..
डोक्याची पट्टी वैगेरे सर्व काही काढून टाकण्यात आले होते…
हाताची पट्टी अजून एक महिना तरी काढायची नाही, हाताला झालेली जखम अजून भरायला थोडा वेळ द्यावा लागेल…..
डॉक्टरांनी अजिंक्य ला समजून सांगितले…..आणि तसं ब्रिगेडियर प्रताप सिंग यांनाही सांगितले….
अजिंक्य उठून उभा राहिला त्याच हाताने त्याने ब्रिगेडियरांना सॅल्युट केला, प्रताप सिंग ही गहिवरले,…..सॅल्युट क्या करता है गले मिल ….असं म्हणून त्याला मिठीच मारली….
अजिंक्यने अमरजीत यांना घरची खुशाली विचारली…..
घर पे आपकी पत्नी और लाडली दोनो ठीक है जी…..
ऊनको इस बारेमे कुछ भी नहीं बताया गया है……
अजिंक्य प्रताप सिंग सरांकडे घरी जाण्यास मागे लागला होता……
आठ दिवसाने विजय राठोड अजिंक्यला भेटायला आले आणि घरी जायची तिकीट देऊन गेले…..
अजिंक्य सोडायला आलेल्या गाडीतून उतरला आणि एका हाताने बॅग ओढत ओढत, जड पावलांनी दरवाजाकडे बघत जात होता, दारात येऊन त्याने डाव्या हाताने बेल वाजवली आणि उजवा हात पाठीमागे लपविला…..
बेलच्या आवाजाने आणि आपल्या बाबाच्या आवाजाने डोळ्यांतून अश्रूंच्या धारा काढत चार वर्षांची काव्या दरवाजाकडे धावली होती……
आपल्या बाबाने आता आपल्याला खूप चॉकलेट्स आणि खाऊ आणला असेल या कल्पनेनेच ती धावत आली होती, पण समोर आपला बाबा हात मागे घेऊन उभा असलेला बघून तिला अजूनच रडायला आले,
त्याच्यातला बाप आता बाहेर आला आणि त्याचेही अश्रू गालावरून ओघळायला लागले…..
नेहमी घरी आला की बाबाने खाऊ आणलेला हात काव्याला दिसायचा आणि ती उडया मारत बाबाच्या कडेवर बसायची………
त्या चार वर्षाच्या चिमुकलीला एकाच हाताने उचलून घेऊन अजिंक्य आत गेला, सुमन त्याच्या आवाजानेच बाहेर आली होती पण ती या दोघांचे काय चाललेय ते पाहत होती….
सुमन त्याच्या मागे वळली आणि किंचाळलीच……..
अजिंक्य हे काय…..
तुमचा हात….
काय झालं…..
कसं झालं….
अहो हे काय झालं…..
अजिंक्य ने काव्या ला हळूच खाली ठेवले….
सुमन शांत हो, ऐक माझं, माझा फक्त हात गेलाय, तिथे कित्येक जवान शहिद झालेत त्यांचं काय…
या त्याच्या एकाच वाक्याने सुमन भानावर आली आणि त्याला बिलगली…..
अगं आम्ही आमचं आयुष्य देशाला तेव्हाच अर्पण करतो जेव्हा भरती होत असताना आम्ही शपथ घेतो……..अजिंक्य सावंत ( फौजी – एक योद्धा )
फौजी – एक योद्धा
आम्ही जगतो देशासाठी
आणि मरतोही देशासाठी
विसरून जातो आम्ही
आहे आमच्या कोणी पाठी
जीव मुठीत धरून आम्ही लढत असतो
शत्रूवर तुटून पडून त्यांचा मुडदा पाडत असतो
रक्ताच्या चिंगाऱ्या उडत असतानाही आम्ही
भारत मातेच्या रक्षणासाठी जीवाशी झगडत असतो
देश-सेवेसाठीच आम्ही सैनिक होतो
देशासाठीच आम्ही घरदार सोडून येतो
आणि देशात काय फक्त जातीय दंगलीचाच रोष असतो
जो तो म्हणे रक्षणाचा ठेका सैनिकांच्याच माथी असतो
कधी समजणार आमचे देशप्रेम या देशवासियांना
अपमानास्पद बोलणाऱ्या त्या तुच्छ कुचेडवात्यांना
आम्ही रोज भोगत असतो इथे मरण यातना
तरी आमची कुचेष्टा करण्या कशी सुचते या नराधमांना
इथवर पोहचलो मेहनतीने, थोरा-मोठ्यांच्या आशीर्वादाने
नाही पडू देणार भारत माते, तिरंगा तुझा अपमानाने
सदैव जिवंत ठेवू नाव तुझे, जरी माखलो रक्ताने
जरी पडलो, अडखळलो, गुदमरलो,कोसळलो धारातीर्थी
तरीही मी सलाम करेन तुला फौजीच्या या ताठ मानेने…..
फौजिच्या या ताठ मानेने…….
- विजय वैशाली दत्ताराम पराडकर
( आण्णा )
मुख्यसंपादक
I like for the story
खुप खुप छान आहे वाचून अंगारे उठतात एक नंबर
आपले मनःपूर्वक धन्यवाद…..
Khup chhan Sir 💥🙏
आपले मनःपूर्वक धन्यवाद……!!💐