Home Blog Page 188
गडहिंग्लज ( अमित गुरव )-: महागाव येथे बनावट नोटा खपवण्यासाठी आलेल्या टोळीला गडहिंग्लज पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून त्यांच्याकडून 100 , 200 , 500 रुपयांच्या जवळपास 1 लाख 88 हजार च्या नोटसह मोटारसायकल जप्त केली आहे. यासाठी पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके , उपनिरीक्षक विक्रम वडणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली . सोबत हेडकाँन्स्टेबल बाजीराव कांबळे , राजकुमार पाटील , नामदेव...
बळीराजाच्या प्रेमाचा ,सण अपुला बैलपोळ्याचा .नंदी वाहन महादेवाचा ,सण बैलाशी पुजण्याचा .१ वर्षभर राबतसे शेतामधूनी,सामान वाहतसे बैलगाडीतूनी.पावसाच्या पाण्यातूनी ,उन्हाच्या तप्त झळांनी .२ कधी खाई फटके आसूडाचे ,कधी अंगावर फिरे हात प्रेमाचे .काम चोख ढवळ्या पवळ्याचे.बळीराजाच्या कल्याणाचे .३ कष्ट करणाऱ्या बैलराजाचा,दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा .दिवस आजचा पोळ्याचा,नैवेद्य गोड पुरणपोळीचा ,४ कवी श्री रेवाशंकर वाघ ठाणे
जीवनाच्या रंगमंचावरवाट्यास आलेली भूमिका,प्रत्येकाला स्विकारावीच लागते. नियतीच्या हातचे बाहुले बनून,सुखदुःखाची उन - सावलीअंगावरती घ्यावीच लागते. संकटं आणि आव्हानांशी,दोन हात ते करताना,प्राणपणाने लढावेच लागते. ऋणानुबंध अन् नातीगोती,जपताना ती, आयुष्यातील,तडजोड ही करावीच लागते. नाना प्रकारची पात्र रंगवीत,अपुल्या जीवननाट्य मंचावरती,दादही मिळवाविच लागते. जीवननाट्याचा अवधी किती?किंचितशी कल्पना नसतानाही,बिनधास्तपणे वावरावेच लागते. खडतर जीवन वाटेवरती,शोध भाकरीचा घेताना,कष्टही अपार करावेच लागते. ध्येयासाठी प्रेरीत होवूनी,आशावादी सदैव राहुनी,जीवन अपुले, सजवावेच लागते. ...
पाऊसधारा येता धरेवर,हर्षित होती सर्व चराचर.पर्ण फुलांना येई बहर,चैतंन्याचे रूप मनोहर. १ आषाढाचे कृष्णमेघ बरसता,धरणीशी ती येई शीतलता.ग्रीष्म ऋतूची दाहक तप्तता,विरूनी जाई बघता बघता. २ ऋतुचक्रातील ऋतू हिरवा,बळीराजाशी देई ओलावा.उगवे धरती अंकुर हिरवा,जणू हिरवाईचा सण नवा. ३ जलधारांनी तनमन भिजता,चैतंन्याने मन मोहरता,अंतरातले शब्द उमटता,जन्म घेतसे नवकविता. ४ नजराणा हा वर्षाऋतूचा,रंग गंध अन् सौंदर्याचा.वसुंधरेच्या शृंगाराचा,धरतीच्या नवसृजनाचा. ५ कवी - श्री रेवाशंकर वाघडोंगरीपाडा ठाणे पश्चिम९८२०१०४९१६
जिवाभावाचे नाते संपुष्टात आले हो आजकालव्यवहारी लोकच जवळची झाली या जगात व्हॉट्सअॅपवर गुडमॉर्निंग करतात आणिदेवाला नमस्कार न करताच घराबाहेर पडतात एफ बी वर दिवसभर ऑनलाईन राहतातपण घरात उपस्थित असून मोबाइलमध्ये रमतात जिवाभावाचे नाते संपुष्टात आले हो आजकालव्यवहारी लोकच जवळची झाली या जगात ऑफिसमध्ये पुढच्या पदांसाठी धावता धावताकित्येकदा समोरच्याच्या भावना दुखावता भेटणाऱ्या पाच अंकी पगारावरकमी पदावरच्या लोकांची लाज दाखवतात जिवाभावाचे नाते संपुष्टात आले हो आजकालव्यवहारी लोकच...
१) 7 दिवस अगोदर वेगवेगळ्या माध्यमातून ( बॅनर , गावदवंडी , इ ) ग्रामसभेची सूचना देणे बंधनकारक आहे २) ग्रामसभेच्या 3 दिवस आधी ग्रामस्थ अर्ज सादर करू शकतात किंवा एकाद्या विषयावर चर्चा घडवून आणण्यासाठी अर्ज करू शकतात. ३) ग्रामपंचायतीने महिलांची विशेष सभा घेणे बंधनकारक आहे. ४) ग्रामपंचतीच्या प्रत्येक वार्डातील सदस्यांना त्या त्या वार्ड मध्ये सभा घेणे बंधनकारक आहे . ५) ग्रामपंचायतीने जर ग्रामसभेचे...
भावनांचे फूल उमलले,कवीमनाच्या अंतरातून.नाविंन्याची विचारकमले,उमलूनी येती शब्दांतून.१ विविध रूपे कवितेची,विविध भाव नवरसांची.उसळे,कविता विद्रोहाची,शौर्य कविता वीररसाची‌.२ स्वप्नवेड्या सुंदरतेची,मोहक हळुवार प्रेमाची.नितांत सुंदर निसर्गाची,वसुंधरेच्या हिरवाईची.३ भक्तीरसाच्या अभंगाची,विचारमौक्तीके प्रबोधनाची.वाट दाविती जीवनाची,प्रगल्भ ऐशा आयुष्याची.४ विरहामधल्या वेदनेची ,दुःखामधल्या संवेदनांची.बळीराजाच्या विवंचनेची,अर्थपूर्ण गर्भित आशयाची.५ ध्यास सदैव कवीमनाचा,शब्दसृष्टीशी चितारण्याचा.नाळ भावनांशी जोडण्याचाअंतरीच्या गूढ ऐशा स्पंदना़ंचा.६ कवी. श्री रेवाशंकर वाघ ,ठाणे ...
सकळ संतांचा शिरोमणी ,हरी अवतार ज्ञानोबा माझा,चिरंजीव समाधीस्त श्री क्षेत्र आळंदीसी ज्ञानोबा माझा.१ छळवणूक सोसूनिया धर्ममार्तंडांची चारही भावंडांनी ,अनुभवले पोरकेपण ,मातापितयाच्या देहत्यागानी .२ सुसंस्कार माता रूक्मिणीचे ,ज्ञानामृत मिळे विठ्ठलपंतांचे,शास्त्र पुराण,वेदांचे ज्ञान ,असे ज्ञानेश्वर महाराजांचे.३ अमृतातेही पैजा जिंके , शब्द मधूर ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे,ज्ञानामृत अमृतानुभवाचे,हरीपाठाचे अभंग नित्यपाठाचे.४ गहिनीनाथांचा अनुग्रह,थोरले बंधू संत निवृतीनाथांशी,निवृतीनाथांचा अनुग्रह ज्ञानदेव,सोपान मुक्ताबाईशी.५ अंगीकारूनी भूतदया,ज्ञानेशांंनी समाजमनासी जागवीले,मार्ग विठ्ठलभक्तीचा दावूनी ज्ञानेशांनी वारकरी मेळवीले.६ लीला दावूनीया नाना...
गोकुळाष्टमीचा दिन श्रीकृष्ण जंन्माचा,कारागृहात कंसाच्या जंन्म घनश्यामाचा.१ वसुदेव देवकीचा हा क्षण पूर्वपुंण्याईचा,यमुनेच्या जळाशी स्पर्श बाळकृष्णाचा. २ महापूर आनंदाचा गोकुळात आलाकृष्णवेड्या गोपिकांचा रास रंगला.३ नादमय मुरलीने राधिकाही भारावलीपुनवेचा चांदण्याने धरतीही सुखावली.४ सकळ हरपले देहभान कन्हैयाच्या मुरलीने,हंबरूनी येती धेनू देवा मुरलीच्या आवाजाने.५ जंन्मोजंंन्मीचे हे फळ मिळे पूर्वपुंण्याईनेलीला रचीता गोपाळ नाचती आनंदाने .६ इंद्रदेव बरसता देवा गोवर्धन पर्वता उचलीले ,कालीयासी मर्दूनी यमुनेसी विषमुक्त‌ केले .७ करीता बाललीला सवंगडी ते...
करूनी वंदन तिरंग्याशी,जयगान स्वातंत्र्याचे गाऊ या.अमृत महोत्सवी वर्षाशी,प्रणिपात विनम्रभावे करू या.१ वेदीवरती स्वातंत्र्याच्या,सर्वस्व अर्पिले हुतात्म्यांनी.स्वातंत्र्यासाठी मायभूमीच्या,इतिहास लिहिला रक्तानी.२ क्रांतीज्योत पेटविणारी,पिढी होती भारावलेली.ज्वलंत ऐशी क्रांतीविचारी,अंगार मनामनात भिनलेली.३ अंधारलेल्या क्षितीजावरती,नवतेजाचा प्रकाश झळकला.कोट्यवधी भारतीयांसाठी,स्वातंत्र्य रवी उदया आला.४ करूनी स्मरण स्वातंत्र्यवीरांचे,आदरांजली तयांसी वाहू या.स्वातंत्र्य दृढमूल करण्याचा ,संकल्प आजला करू या.५ मतभेदाना विसरूनी आपण ,प्राधांन्य देशहितासी देऊ या .लोकशाहीचा संन्मान वाढवून,जयहिंद विश्वामधूनी गर्जू या‌.६ अमृतमहोत्सव अपुला स्वातंत्र्याचा ,अपुल्या भारतमातेच्या गौरवाचा...