सोलापूर : राष्ट्रीय महामार्गावर टोल नाक्यावर १ जानेवारी २०२१ पासून टोल वसुलीची प्रक्रिया फास्टटॅगद्वारे सुरू झाली आहे. चारचाकी वाहनधारकांनी तत्काळ फास्टटॅग बसवून घ्यावे, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी सांगितले. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाने प्रवासी वाहतूक करणारी चारचाकी वाहने...
सातारा : (प्रतिनिधी ) - सातारा जिल्ह्यातील तब्बल १२३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तसेच ९८ ग्रामपंचायती अंशतः बिनविरोध झाल्या असून उर्वरित ६५४ ग्रामपंचायतींतून ९५२१ उमेदवार रिंगणात आहेत.
बहुतांशी ग्रामपंचायतीत दुरंगी किंवा तिरंगी लढती होत असून महाविकासचा फॉर्म्यूला सातारा जिल्ह्यात दिसत नसल्याचे चित्र आहे. सातारा जिल्ह्यातील मार्च ते डिसेंबर अखेर मुदत संपलेल्या...
मध्य प्रदेश - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथील प्रशासनाने पुढील १५ दिवसांसाठी कोंबड्या तसेच अंडी विक्री करणारी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
मंदसौरमध्ये अनेक मृत कावळे आढळून आल्यानंतर बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा उपाय म्हणून कोंबड्या आणि अंड्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मध्य प्रदेशमध्ये २३ डिसेंबर ते ३...
तिरुपती : (प्रतिनिधी )- माणसाच्या आयुष्यात अनेक भावनिक क्षण येत असतात. आपल्या लेकरांनी गाठलेले यशोशिखर पाहून आई-वडिलांना अत्यानंद होत असतो. अशीच एका घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आंध्र प्रदेश पोलिस दलात मंडळ निरीक्षक पदावर असलेल्या एका पित्याने पोलिस उपअधीक्षक झालेल्या मुलीला सर्वांच्या समोर सॅल्यूट केला.
...
आजरा (अमित गुरव ) -: बारावी शिक्षणानंतर परिस्थिती वर मात करत नियमित व्यायाम करत ते सैन्यात भरती झाले होते.आजरा तालुक्यातील मडिलगे हे छोटेसे गाव. निवृत्त नाईक सुभेदार संभाजी विष्णू घाटगे हे दि. १/१/२०२१ रोजी २४ वर्षे देशसेवा बजावून सेवा निवृत्त झाले.
नाईक सुभेदार घाटगे यांनी हैद्राबाद ,सिकंदराबाद , पंजाब , दाजीलिंग, गाँल्हेर , हुबळी ,बेळगाव , या ठिकाणी...
बेळगाव : कर्नाटकातील प्रसिद्ध गोकाकच्या धबधब्यावर काचेच्या ब्रीजची निर्मिती करण्यात येणार आहे. धबधब्यापासून केवळ 20 मीटर अंतरावर अमेरिकेतील धबधब्याच्या धर्तीवर काचेच्या ब्रीजची निर्मिती करण्याची योजना आखण्यात आली आहे. हिडकल डॅम, गोकाक धबधबा आणि गोडचिनमलकी धबधबा ही तिन्ही पर्यटन स्थळे एकमेकांपासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर आहेत. या तिन्ही पर्यटन क्षेत्रांचा विकास करण्याची योजना जलसंपदा आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री...
मुंबई ( प्रतिनिधी ) -: राज्यत ग्रामपंचाती चे वातावरण तापले आहे. मात्र काही ठिकाणी सरपंचपदासाठी लाखो रुपयांची बोली लावून ते विकत घेतले . हा धक्कादायक प्रकार व्हिडीओ आणि बातम्यांच्या रुपात बाहेर आला आणि त्यामुळेच राज्याच्या निवडणूक आयोगाने त्याची गंभीर दखल घेतली. आणि सर्व जिल्हाधिकारी यांना चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी दिले. उमेदवारी...
दरवर्षी पेक्षा उशीरा सुरू झालेला भारतीय द्राक्ष हंगाम व द्राक्षबागांमध्ये झालेले नुकसान तसेच स्पर्धक देशांतील कमी झालेला पुरवठा व जागतिक आरोग्य संघटनेने द्राक्षांवरील कोरोना विषाणू प्रतिरोधक क्षमता असल्याचा दिलेला दाखला यामुळे बाजारपेठेत वाढलेली मागणी पहाता युरोपियन बाजारपेठेत भारतीय द्राक्षांना उच्चांकी दर व मागणी मिळण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त...
मुंबई – राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड अलीकडेच हायकमांडने केली, त्यापाठोपाठ आता राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आज दिल्लीत असून पक्ष प्रभारी आणि हायकमांडची भेट घेऊन प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात काँग्रेस संघटनेत बदल होणार असल्याची चर्चा...
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली याला शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सौरव गांगुलीवर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. यादरम्यान सीपीआयचे ज्येष्ठ नेते अशोक भट्टाचार्य यांनी सौरव गांगुलीवर राजकारणात येण्यासाठी खूप दबाव असल्याचा दावा केला आहे. "सौरव गांगुलीवर राजकारणात येण्यासाठी खूप दबाव असून काही...