घडामोडी
होमिओपॅथीक डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत केली जावी –होमिओपॅथीक डॉक्टर संघटनेचे तहसीलदारांना निवेदन
अमित गुरव
कोणत्याही संघटनेच्या दिशाभूल करणाच्या दबावाला बळी पडू नये
आजरा (हसन तकीलदार ):-आजऱ्यातील होमिओपॅथीक मेडिकल असोसिएशन ही तालुक्यातील होमिओपॅथीक डॉक्टरांची संघटना आहे. इतर कोणत्याही दबावाला अथवा कोणत्याही संघटनांच्या अफवाना बळी न पडता होमिओपॅथीक डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी करून घ्यावे अशा मागणीचे निवेदन होमिओपॅथीक डॉक्टर संघटनेने आजरा तहसीलदारांना दिले आहे.
...
राज्यात अनेक ठिकाणी परिषदा घेण्याचा जनवादी सांस्कृतिक चळवळीचा निर्णय….
*आजरा(हसन तकीलदार )-राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिली पासून हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला असला तरी नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली आहे. त्यामुळे हिंदी सक्तीचा जी.आर. मागे घेण्याची सरकारची भूमिका फसवी असल्याची वाटते. समिती नेमून आपल्याला अनुकूल असा अहवाल या समितीकडून घेण्याचा हा एक डाव आहे. याला आमचा विरोध असून जोपर्यंत...
आजरा (हसन तकीलदार) –नौरोसजी वाडिया कॉलेज, पुणे यांच्या मार्फत एप्रिल 2025 मध्ये घेण्यात आलेल्या एम.टी.एस. (MTS) परीक्षेत आजरा येथील व्यंकटराव हायस्कूलच्या इयत्ता नववीतील तब्बल २२ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. जिल्हा, तालुका तसेच विशेष प्राविण्य व प्रशस्तीपत्र प्राप्त यादीत स्थान मिळवणाऱ्या या विद्यार्थ्यांनी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
🔸 यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आजरा महाल शिक्षण मंडळाच्या वतीने...
आजरा (हसन तकीलदार):-महाराष्ट्र मेडिकल कौन्सील (एम.एम.सी.) ही ऍलोपॅथी पदवी प्राप्त असणाऱ्या डॉक्टरांची नोंदणी व नियंत्रण करणारी संस्था आहे. तरीसुद्धा होमिओपॅथी करणाऱ्या डॉक्टरांना एक वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स ऑफ मॉडर्न फार्मेकोलॉजि हा कोर्स सुरु करून त्यांना एम. एम. सी. ची नोंदणी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय साडेपाच वर्षे व त्या पुढील शिक्षण घेतलेल्या ऍलोपॅथी डॉक्टरांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे...
आजरा ( अमित गुरव ) –कोल्हापुरच्या इतिहासात अढळ स्थान असलेल्या थोर समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ९ जुलै २०२५ रोजी आजरा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम तालुका आरोग्य कार्यालय, पंचायत समिती आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आले.
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त २६ जून ते २० जुलै २०२५ या कालावधीत राज्यभरात विविध...
आजरा(हसन तकीलदार ):-येथील व्यंकटराव हायस्कूल मध्ये इयत्ता नववी च्या वर्गात शिकणारी कु. सौश्रुति अमित पुंडपळ हिची नवोदय विद्यालय कागल येथे निवड झाली आहे. तिने 85पैकी 74 गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यामधून मधून तिची निवड करण्यात आली आहे. या यशस्वी विद्यार्थीनीला सौ.ए.डी.पाटील,पी एस.गुरव व्ही.ए.चौगुले,श्रीमती पाटील आर् एन यांचे मार्गदर्शन लाभले. व प्राचार्य श्री.एम.एम.नागुर्डेकर, माजी...
घडामोडी
आजरा नगरपंचायती कडून प्लास्टिक बंदीवर धडक मोहीम – ३ किलो प्लास्टिक जप्त , ५८०० दंड वसूल
अमित गुरव
आजरा (हसन तकीलदार) –मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या पार्श्वभूमीवर आजरा नगरपंचायतीकडून शहरात प्लास्टिक बंदीबाबत धडक कारवाई करण्यात आली. बाजारपेठ आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये तपासणी करत ३ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले असून दोषींवर ५८०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
ही कारवाई दि. १ मे २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार करण्यात आली....
भादवण (अमित गुरव ) – आदर्श विद्या मंदिर, भादवण शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावात पारंपरिक वेशभूषेत, टाळ-मृदंगाच्या गजरात, विठुनामाच्या घोषात एक भक्तिपूर्ण दिंडी काढली. लहानग्या विद्यार्थ्यांनी साकारलेला हा पायी वारीचा सोहळा ग्रामस्थांना एक वेगळा आध्यात्मिक अनुभव देणारा ठरला.
वारकरी परंपरेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, तसेच त्यांच्यातील संस्कार आणि भक्तीची भावना वृद्धिंगत व्हावी, यासाठी शाळेतील शिक्षक वृंदांनी विशेष मेहनत घेतली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक भगवे, पांढरे...
आजरा (हसन तकीलदार ):-आजरा नगरपंचायत हद्दीतील सर्व गल्ल्या तसेच कॉलनीतील पथदिवे तसेच रस्त्याबाबतच्या व्यवस्थेची पार दुर्दशा झाली आहे. एकेका गल्लीत जवळपास 6ते 7महिने झाले रस्त्यावरची दिवाबत्ती बंद झाली आहे.वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्याचप्रमाणे गटारी व नवीन नळकनेक्शनसाठी रस्ता खुदाई झालेमुळे आणि यावर्षी मे महिन्यापासूनच संततधार पाऊस पडत असलेमुळे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड्यामध्ये...
आजरा (हसन तकीलदार ) :-यावर्षी साधारणपणे मे महिन्यापासूनच पावसाचे प्रमाण सतत व जास्त असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी तरवे, टोकण, ल्हवे पेरली होती ते कुजण्याचे प्रमाण जास्त झाले. जून महिन्यातच तालुक्यातील ओढे, नाले, नद्या ओसंडून वाहू लागली आहेत. नदी -नाल्याकाठाच्या ऊसाच्या शेतात पाणी साचून राहिल्यामुळे ऊस पिकाचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे आजरा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशा मागणीचे निवेदन आजरा...









