Home Blog Page 4
आजरा(हसन तकीलदार ):-येथील व्यंकटराव हायस्कूल मध्ये इयत्ता नववी च्या वर्गात शिकणारी कु. सौश्रुति अमित पुंडपळ हिची नवोदय विद्यालय कागल येथे निवड झाली आहे. तिने 85पैकी 74 गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यामधून मधून तिची निवड करण्यात आली आहे. या यशस्वी विद्यार्थीनीला सौ.ए.डी.पाटील,पी एस.गुरव व्ही.ए.चौगुले,श्रीमती पाटील आर् एन यांचे मार्गदर्शन लाभले. व प्राचार्य श्री.एम.एम.नागुर्डेकर, माजी...
आजरा (हसन तकीलदार) –मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या पार्श्वभूमीवर आजरा नगरपंचायतीकडून शहरात प्लास्टिक बंदीबाबत धडक कारवाई करण्यात आली. बाजारपेठ आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये तपासणी करत ३ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले असून दोषींवर ५८०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही कारवाई दि. १ मे २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार करण्यात आली....
भादवण (अमित गुरव ) – आदर्श विद्या मंदिर, भादवण शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावात पारंपरिक वेशभूषेत, टाळ-मृदंगाच्या गजरात, विठुनामाच्या घोषात एक भक्तिपूर्ण दिंडी काढली. लहानग्या विद्यार्थ्यांनी साकारलेला हा पायी वारीचा सोहळा ग्रामस्थांना एक वेगळा आध्यात्मिक अनुभव देणारा ठरला. वारकरी परंपरेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, तसेच त्यांच्यातील संस्कार आणि भक्तीची भावना वृद्धिंगत व्हावी, यासाठी शाळेतील शिक्षक वृंदांनी विशेष मेहनत घेतली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक भगवे, पांढरे...
आजरा (हसन तकीलदार ):-आजरा नगरपंचायत हद्दीतील सर्व गल्ल्या तसेच कॉलनीतील पथदिवे तसेच रस्त्याबाबतच्या व्यवस्थेची पार दुर्दशा झाली आहे. एकेका गल्लीत जवळपास 6ते 7महिने झाले रस्त्यावरची दिवाबत्ती बंद झाली आहे.वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्याचप्रमाणे गटारी व नवीन नळकनेक्शनसाठी रस्ता खुदाई झालेमुळे आणि यावर्षी मे महिन्यापासूनच संततधार पाऊस पडत असलेमुळे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड्यामध्ये...
आजरा (हसन तकीलदार ) :-यावर्षी साधारणपणे मे महिन्यापासूनच पावसाचे प्रमाण सतत व जास्त असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी तरवे, टोकण, ल्हवे पेरली होती ते कुजण्याचे प्रमाण जास्त झाले. जून महिन्यातच तालुक्यातील ओढे, नाले, नद्या ओसंडून वाहू लागली आहेत. नदी -नाल्याकाठाच्या ऊसाच्या शेतात पाणी साचून राहिल्यामुळे ऊस पिकाचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे आजरा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशा मागणीचे निवेदन आजरा...
रिक्षाचालकाचा आदर्श! १.५ लाख किमतीचा मोबाईल मालकाला परत नांदेड(प्रतिनिधी) – प्रामाणिकपणा आजच्या काळात दुर्मिळ होत चालला असतानाही समाजात अजूनही काही उदाहरणं अशी आहेत, जी विश्वास वाढवणारी ठरतात. अशाच एका प्रसंगाचा अनुभव नांदेडकरांना आला. टायगर ऑटो रिक्षा संघटनेचे सदस्य अब्दुल मुबीन अब्दुल मजिद (रा. हजरत फिर बुऱ्हाणनगर, नांदेड) यांच्या रिक्षामध्ये प्रवास करत असताना वैष्णवी (रा. श्रीनगर, नांदेड) हिने आपला iPhone 14 Pro...
सैफ अली खानची १५,००० कोटींची संपत्ती "शत्रु संपत्ती" काय आहे आणि याचा भवितव्य काय? 🏰 संपत्तीचा स्रोत – पाटौडी वंशजांची वारसा जागा सैफ अली खान हे पाटौडी घराण्याचे वारस आहेत. त्यांच्या कुटुंबाकडे भोपालमधील ऐतिहासिक वास्तूंचा समृद्ध वारसा आहे – जसे की Flag Staff House, Noor‑Us‑Sabah महाल, Dar‑Us‑Salam आणि इतर लोकांना ‘शत्रु संपत्ती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागा . या जागांची अंदाजे किंमत ₹15,000...
आजरा(हसन तकीलदार) …येथील व्यंकटराव शैक्षणिक संकुल आजरा अंतर्गत व्यंकटराव प्राथमिक विद्यामंदिर आजरा मधील इयत्ता पहिली ते चौथी या वर्गातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी आज आषाढी एकादशी निमित्त साक्षात विठ्ठल- रखुमाई, आणि वारकरींची वेशभूषा केली होती. साक्षात पांडुरंगाच्या नामाचा गजर.. टाळ मृदुंगाच्या नादात साक्षात या बालचमु वारकऱ्यांची दिंडी प्रशालेच्या प्रांगणात व विठ्ठल रुक्माई मंदिर,आजरा शहरात काढण्यात आली. साक्षात विठ्ठल रुक्मिणी अवतरल्यासारखे...
गडहिंग्लज (कोल्हापूर) –राज्यात लाचखोरीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला यश मिळत असताना, गडहिंग्लज येथील एका महिला पोलीस उपनिरीक्षकावर लाच घेण्याचा आरोप सिद्ध झाल्याची मोठी कारवाई समोर आली आहे. 🔸 आरोपी – निता शिवाजी कांबळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, गडहिंग्लज पोलीस स्टेशन 🔸 तक्रार – अपघात प्रकरणात अडकलेल्या मुलाच्या वाहन सोडवण्यासाठी ६०,००० रुपयांची लाच मागणी 🔸 कारवाई – ACB कोल्हापूर युनिटमार्फत रंगेहात ४०,००० रुपये घेताना...
ठाकरे पुन्हा एकत्र! मराठीसाठीचा नवा अध्याय सुरू – वरळीतील विजयी मेळाव्यात जोशपूर्ण घोषणा मुंबई (५ जुलै २०२५) | विशेष प्रतिनिधी राजकारणात कधीच एकत्र न आलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे २० वर्षांनंतर पहिल्यांदाच एका व्यासपीठावर! मराठी अस्मिता, भाषा अभिमान आणि हिंदी सक्ती विरोधात एकत्र आलेल्या या ठाकरे बंधूंनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठी जागृतीची लाट निर्माण केली आहे. 🎤 उद्धव ठाकरे म्हणाले: “आता...