दाही दिशा बहरल्या
गंधाळली माती
गाजले गुंजन पैंजणांचे
उजळल्या ज्योती….
घाबर्या- घुबर्या पावलांनी
कळी उतरली अंगणी
आली माझ्या घरा
चिव-चिव करत चिमणी….
तुझ्या येण्यानं
मन माझं सजलं
तूझ्या भेटीसाठी होतं
काळीज माझं आतुरलं….
-सौ.भाग्यश्री आपेगांवकर
मुख्यसंपादक