मन पाखरू

सप्तरंगी उडू लागले
प्रेमनगरी शोधू लागले
आठवणीत रमू लागले
एकांतात बोलू लागले…

मन पाखरू झाले
स्वच्छंदी हरवून गेले
मन उनाड झाले
कल्पनेत रंगुन गेले…

प्रत्यक्षात प्रतिबिंब दिसू लागले
विचारात मन हळवे झाले
अनोळखे वाटले, अस्तित्व दिसले
मन हे सावरू लागले…

कधी इकडे तिकडे जाऊ लागले
क्षणात मन पाखरू झाले
कधी रडू लागले,कधी रूसु लागले
अंतरंगात मन पाखरू झाले…

-अनिकेत अनिल परीट

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular