आजरा(हसन तकीलदार):- मागील एक दीड महिन्यापासून शिवसेना (उबाठा )तर्फे आजरा -बुरुडे -महागाव रस्त्यावरील खड्डे भरावे, संताजी पुलाला 100वर्षे पूर्ण झाल्यामुळे या पुलाचे बांधकाम जीर्ण झाले असून यासाठी पर्यायी पूल तयार करावे तसेच बुरुडे भटवाडी आणि कासार कांडगाव कडे जाणाऱ्या रस्त्यासाठी सिमेंट पाईप्स घालून गटारीच्या पाण्याचा योग्य निचरा करावा यासाठी लढा सुरु आहे. याबाबत शिवसेना (उबाठा )चे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील...
गडहिंग्लज | प्रतिनिधी:कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरात मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या उभारणीसाठी पशुसंवर्धन विभागाची जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली.
गडहिंग्लज शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी पशुसंवर्धन विभागाच्या मालकीची ३.०६ एकर जागा आहे. या पैकी ०.७५ एकर जागा प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उर्वरित जागा पशुसंवर्धन विभागाकडेच ठेवण्याचे ठरवण्यात आले असून, पशुसंवर्धन विभागाच्या पुनर्रचनेनुसार नवीन तालुका पशुसंवर्धन...
घडामोडी
सुर महाराष्ट्राचा ऑनलाईन मराठी गीत गायन स्पर्धेमध्ये हळोलीचा संदीप कांबळे अंतिम फेरीत
अमित गुरव
आजरा (हसन तकीलदार ):-आजऱ्यातील हाळोली सारख्या लहानशा खेड्यातील हरहुन्नरी कलाकार संदीप कोंडीबा कांबळे याने सुर महाराष्ट्राचा पर्व सहावे मराठी गाण्यांच्या मराठमोळी ऑनलाईन गायन स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीतून अंतिम फेरी मध्ये झेप घेतली आहे. हाळोली सारख्या लहानशा खेड्यातला हा कलाकार अत्यंत गरिब आणि प्रतिकूल परिस्थितीतून आपली कला जोपासत या ऑनलाईन गायन स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारणे इतके सोपे नव्हते. कलेबद्दल असलेली...
कोल्हापूर, २ जुलै २०२५ - : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाने व्हिडीओ निर्मितीच्या क्षेत्रात क्रांती घडवली आहे. लिंकमराठी न्यूजच्या या विशेष अहवालात, आम्ही एआय व्हिडीओ निर्मितीचे फायदे, उपयोग आणि त्याचबरोबर त्याच्या गैरवापरामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकत आहोत. याच पार्श्वभूमीवर, कोल्हापुरात हिमवृष्टीचा एक व्हायरल व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे, जो व्हीओ३ (Veo3) या एआय तंत्रज्ञानाचा वापर करून निर्मितीच्या सामर्थ्याचे प्रदर्शन...
औरंगाबाद / छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): शिवसेना खासदार संदीप भुमरे आणि त्यांच्या आमदार पुत्र विलास भुमरे यांच्या १३ वर्षांच्या ड्रायव्हर जावेद रसूल शेख याच्यासाठी अचानक ३ एकर जमीन “गिफ्ट” स्वरूपात हस्तांतरित झाल्याने प्रकरण भरकटले आहे. हैदराबादच्या उल्लेखनीय सालारजंग कुलीन वंशाच्या वंशजांनी दिलेल्या या “हिबानाम्या”तून त्याला मिळालेली जमीन १५० कोटींच्या अंदाजित किमतीची असल्याचे EOW तपासात समोर आले आहे .
🔍 तपासाची मुख्य...
घडामोडी
मनात घेतलं तर सर्व काही होतं… स्व. विमलाबाई सरदेसाई ट्रस्ट, लाटगावचे आदर्शवत कार्य
अमित गुरव
आजरा (हसन तकीलदार) :-केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे अशी उक्ती आहे. यालाच अंगीकारत स्व. विमालाबाई सरदेसाई ट्रस्टचे संस्थापक लाटगावचे सामाजिक कार्यकर्ते रणजित सरदेसाई यांनी एक आदर्शवत कार्य करीत युवकांना आदर्श दिला आहे. गांधीनगर येथे गटारीच्या कामकाज आणि दर्जावरून अर्ध्यावरच गटारीचे काम थांबवले गेले. याचा परिणाम म्हणून अर्धवट गटारीतील सर्व पाणी रस्त्यावरून वाहू लागले. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडून गुडघ्याएवढे...
आजरा (हसन तकीलदार ):-आजरा -हाजगोळी बंधाऱ्यांवरील स्लॅबच्या लोखंडी सळ्या दिसत होत्या त्यावेळीच जर दुरुस्ती झाली असती तर आज ही परिस्थिती ओढावली नसती. एक ते दीड महिना उलटून गेला तरीही बंधाऱ्याची दुरुस्ती अथवा डागडुगी झालेली नाही कि याकडे कोणीही गांभीर्याने पाहिले नाही. बंधाऱ्यांवर मोठा खड्डा पडला असल्यामुळे तेथील वाहतूक तात्पुरती बंद केली असल्याचे समजते.
https://youtube.com/shorts/oYhsJP9UXAo?si=K6eljl1BLJpMJSlz
...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीचे दोन्ही शासन निर्णय (GRs) आज रद्द करण्याची घोषणा केली आहे. यामुळे राज्यात पहिल्या ते पाचवीपर्यंत हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय मागे घेतला गेला. तसेच, डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक तज्ञ समिती स्थापन करण्याची माहिती त्यांनी दिली, ज्यामध्ये ‘त्रिभाषा सूत्र’ कधी सुरू करण्यात यावे याचा अभ्यास करणार आहे .
मुख्य मुद्दे:
१६ एप्रिल आणि १७ जून...
घडामोडी
कोल्हापुरात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाकडून हिंदी सक्तीच्या परिपत्रकाची होळी – मुख्यमंत्र्यांवर जोरदार घोषणाबाजी
अमित गुरव
कोल्हापूर (प्रतिनिधी) –राज्यात केंद्र सरकारच्या हिंदी सक्तीच्या धोरणाविरोधात संतापाची लाट उसळत असून, अनेक ठिकाणी विविध राजकीय पक्षांकडून विरोध व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आक्रमक होत, आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदी सक्तीच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली.
या आंदोलनाचं नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केलं. त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षणमंत्री...
आजरा (हसन तकीलदार ):-पावसाळा आणि त्यातच शेतीच्या कामाना वेग यामध्ये छत्रपती शाहू महाराजांची जयंती येत असल्यामुळे शाहू महाराजांची जयंती साजरी करताना मर्यादा येतात. या बाबींचा विचार करत आजऱ्यातील बहुजन मुक्ती पार्टी, दलित मानवी संघटना, भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन युवा आघाडी, रिपब्लिकन सेवा, सेक्युलर मूव्हमेंट या सर्व संघटना एकत्र येत छत्रपती लोकराजे शाहू महाराजांची 151वी जयंती उत्साहात साजरी करण्याचा...








