Homeवैशिष्ट्येसन्मान " ती " चा

सन्मान ” ती ” चा

 आज ८ मार्च जागतिक महिलादिन , संपूर्ण जगभरात उत्साहाने साजरा केला जातो . या दिवशी विविध क्षेत्रात कामगिरी बजावलेल्या महिलांना पुरस्कार दिला जातो . पण हा महिला दिन का साजरा करावा लागतो . जसे पाठीचा कणा हा एक शरीराचा भक्कम आधार असतो तसेच स्त्री

ही आपल्या घराचा , समाजाचा सुद्धा भक्कम कणाच आहे . आज तिने सर्व क्षेत्रात प्रगती केली . पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती सर्वत्र वावरते …
तरीपण तिला या हक्कासाठी झगडावे लागते अजूनही !

 अगदी सुरुवातीला तर स्त्रियांना मतदानाचा हक्क ही नाकारलेला होता . कारण सर्वत्र पुरुषप्रधान संस्कृती ठासून भरलेली होती . एक स्त्री आपल्या बरोबरीने आपल्याला हक्क मागते हाच अहंकार त्यांना झोंबत होता .

 युरोप , अमेरिकेत तर १८ व्या शतकात महिलांनी लढा देऊन मतदानाच्या हक्कासाठी अनेक ठिकाणी निदर्शने केली .१९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.

  ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेत , न्यूयॉर्क मध्ये 

हजारो स्त्री कामगारांनी प्रचंड निदर्शने करून सरकारला झुकवून आपल्या लिंग , वर्ण , मालमत्ता , शिक्षण , मतदान हक्क या मागण्या मान्य करून घेतल्या . या स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरी स्मरणार्थ ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून ठराव पास झाला .

   स्त्री जर समाधानी असेल तर अख्खे घर हसत - खेळत असते . प्रत्येक गोष्टीत तिचा सहभाग असतो . ती घरची लक्ष्मी असते . तिला तिचे स्थान हवे असते . माणुसकीच्या नात्याने प्रेम , मायेचा दिलासा हवा असतो . पण जर का तिच्याकडे दुर्लक्ष झाले तर ती चवताळून उठते . हक्कासाठी भांडली तर समाज तिच्यावर कजाग , उद्धट म्हणून बोल लावतो तिच्या मनावर हळुवार फुंकर घालावे , समजून घ्यावे हीच तिची अपेक्षा असते . स्त्री म्हणजे संसाराचे रथाचे चाक असते !

 एकदा लग्न झाले की विवाहित असण्याचे लायसन्स मात्र फक्त स्त्रीला घालून तसेच नवऱ्याच्या नावाने कुंकू लावून समाजात वावरावे लागते . पुरुष मात्र विवाहित का अविवाहित समजत नाही . आपल्या समाजात पुरुषांना फक्त मिस्टर संबोधन पण स्त्रियांना मिस आणि मिसेस हा शब्दप्रयोग वापरतात . का पण हा प्रश्न अधांतरीच ! विधवेला मात्र अजूनही ग्रामीण भागात अलंकार उतरावे लागतात . खरंतर समानता दोघांच्या बाबतीत सारखीच असायला हवी ना !


  १९ व्या शतकात स्त्री उंबरठा ओलांडून बाहेर पडली आहे. याचे कारण तिच्यावर होणारा अन्याय 

अत्याचार ! अपमान ! …
या विरुद्ध आवाज उठवावा म्हणून !! …..
आज स्त्री स्वातंत्र्यासाठी बाहेर पडली , पुरुषांच्या बरोबर सर्वच क्षेत्रात अगदी राजकारण पासून तिन्ही दले तिने काबीज केली . सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी ती बजावत आहे !! आपल्या देशात उपराष्ट्रपती , पंतप्रधान , संरक्षण मंत्री पर्यंत महिलांनी झेप घेतली आहे .

  आजही कामावरून घरी परतल्यावर पुरुष दमतो पण बाई मात्र खंबीरपणे किचन चा ताबा घेऊन घरासाठी झटते . घर सुखासमाधात

कसे राहिलं ! याकडे तिचे लक्ष असते . स्त्री ला तुम्ही कमजोर समजू नका तर कणखर , खंबीर उपाधी लावा . देवाने निर्मिती केलेली ती सुंदर कलाकृती आहे . निसर्गाने बहाल केलेले सौन्दर्य तिच्याकडे आहे . ती शुभ्र फेसळता धबधबा आहे . पण तिच्या वाटेला आलेले अर्धे आभाळ अजून काळवंडलेले आहे आणि हे मळभ दूर करण्यासाठी तिचा निकराचा लढा चालूच आहे . अनेक क्षेत्रात ती अजूनही लढत आहे . तिच्या हक्काच्या मागण्यासाठी !

 तर आज महिला दिनाचे गोड संदेश , समारंभ वगैरे बघून हुरळून जाऊ नका . ज्यांना खरंच मदतीची , सहानभूतीची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करा . लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवा !

 विशेष म्हणजे मुलगा मुलगी भेदभाव बिलकुल करू नका . प्रत्येक घरटी एक मुलगी असा संदेश सर्वत्र फिरवा ! प्रत्येक स्त्री च्या गाभाऱ्यात एक कला लपलेला असते . वेळीच तिला ओळखून एक रेखीव रूप द्या . शेवटी काय दिखाऊ , सुंदर स्त्री म्हणून जीवन न जगता एक परिपूर्ण म्हणून आणि एक कलाकार म्हणून मानाने जगा ! आपल्यातील कलेला प्राधान्य द्या ...

 शेवटी काय तर ....मी अबला नाही सबला म्हणूनच जगेन अशी खूणगाठ पक्की करा ! मला ही " ती " चा सन्मान हवा आहे .....!!
 • सौ राजश्री भावार्थी ( पुणे )

https://surveyheart.com/form/615fcb6ec182fe215fb90303

लेखक व कवींना व्यासपीठ निर्माण करण्यासाठी लिंक मराठी हे न्यूज पोर्टल घेऊन येत आहे एक सुवर्णसंधी .
तुमचे स्वलेख नावासह प्रसिद्ध केले जातील ; यासाठी कोणताही मोबदला घेतला जात नाही.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular