Home Blog Page 4
भादवण ( सुभाष पोवार ) -: हिरण्यकेशी नदीवरील हिरलगे-कोवाडे बंधाऱ्यालगत सोमवार दुपार नंतर घडलेल्या दुर्दैवी घटनेत मामा व भाचा यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सुनील विष्णू सुतार (वय 50) व त्यांचे भाचे प्रवीण पांडुरंग सुतार (वय 36) हे हिरलगे येथे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रमानंतर दुपारी मामाला कोवाडे येथे सोडण्यासाठी...
एस.टी. महामंडळाची NCMC प्रणाली म्हणजे काय?प्रवाशांसाठी “One Nation One Card” सुविधा; रोख रक्कम न बाळगता करता येणार प्रवासमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी “नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड” (NCMC) प्रणाली लागू करण्यास सुरुवात केली आहे. केंद्र शासनाच्या “One Nation One Card” संकल्पनेअंतर्गत ही सेवा सुरू करण्यात आली असून, यामुळे एस.टी. प्रवाशांना तिकीटासाठी रोख रक्कम बाळगण्याची गरज...
पिग्मी एजंट, ठेवीदार आणि संस्थांच्या भविष्याचा समतोल साधण्याची वेळ — संपादकीय | Link Marathi महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. सहकार विभागाने नुकत्याच जारी केलेल्या निर्देशांनुसार पिग्मी एजंटांना दिल्या जाणाऱ्या कमिशनवर मर्यादा आणण्यात आली असून, ठेवींवरील व्याजदर आणि प्रशासकीय खर्चाबाबतही काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्णयानंतर राज्यभरातील हजारो पिग्मी प्रतिनिधींमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे. दुसरीकडे,...
आजरा ( अमित गुरव ) : पुणे जिल्ह्यातील नरसापुर येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली येथे तरुणीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. पंचायत समिती आजरा यांच्या उपसभापती सौ. यशोदा युवराज पोवार यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे.या निवेदनात संबंधित आरोपींवर जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली...
भादवण (आजरा) : भादवण हे गाव राजकीय दृष्ट्या नेहमीच चर्चेत राहिलेले आहे. गावात विविध गट आणि स्थानिक नेत्यांमुळे राजकारणात कायमच चुरस पाहायला मिळते. मागील काही काळात स्पष्ट नेतृत्वाच्या अभावामुळे गावातील भाजपची स्थिती नेमकी काय आहे, असा प्रश्न काही ग्रामस्थांमध्ये उपस्थित होत होता. दरम्यान, अलीकडेच समरजित घाटगे यांच्या पक्ष प्रवेशामुळे...
आजरा (अमित गुरव ) - शालेय उन्हाळी सुट्ट्या आणि कमी झालेल्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर आजरा आगाराकडून काही एस.टी. बसफेऱ्या तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित मार्गांवरील प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना वेळापत्रकाची खात्री करूनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच अंगारकी संकष्टी निमित्त जादा गाड्या सोडण्यात येतं असून बुकींग करुन आपली सीट बुक करू शकता. 7:30 - आजरा...
आजरा ( अमित गुरव ) : पंचायत समिती आजरा व आरोग्य विभागाच्या वतीने “माझं गाव – आरोग्य संपन्न गाव” या अभियानांतर्गत कार्यशाळा तसेच टीबी मुक्त झालेल्या ग्रामपंचायतींचा पुरस्कार वितरण सोहळा आज (दि. 30 एप्रिल 2026) तहसील कार्यालय, आजरा येथील सभागृहात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती आजराचे सभापती जयश्री गाडे होते. यावेळी उपसभापती यशोदा पवार, जिल्हा परिषद सदस्य...
सातारा -: डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने गोवा येथे आयोजित करण्यात येत असलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनानिमित्त राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना निमंत्रण पत्रिका देण्यात आली.गेल्या पाच वर्षांपासून डिजिटल मीडिया क्षेत्रात अविरत कार्यरत असलेली ही संघटना आता राष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, दिल्ली, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या सात राज्यांत विस्तारलेल्या या संघटनेचे तब्बल...
आजरा / कोल्हापूर (प्रतिनिधी):कोल्हापूर जिल्ह्यातील घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मोठे यश मिळाले आहे. या कारवाईत 3 आरोपींना अटक करून तब्बल 7 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून, सुमारे 20 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक...
भादवण गावात काल संध्याकाळी 6 -7 वाजता दोघांच्यात तुफान हाणामारी घडली. हाणामारीत आपण कोणाची गाडी म्हणून कोणाच्या गाडीवर दगड टाकतोय हेच त्यातील एकाला समजेना. नशिबाने तो उचललेला दगड गाडीवर किंवा कोणाच्या डोक्यावर पडला नाही ही एकच गोष्ट चांगली घडली असेच म्हणावे लागेल. ...