घडामोडी
आजरा / आंबोली राष्ट्रीय महामार्गावरील टोलची जागा बदलावी – कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग – शिवसेना उभाठा गट यांचे
अमित गुरव
आजरा.- प्रतिनिधी.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग यांना निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. की, संकेश्वर बांदा चा राष्ट्रीय महामार्ग व आजरा ते आंबोली या दरम्यान आजरा तालुक्यातील आजरा शहरापासून जवळच असणाऱ्या एम.आय.डीसी जवळ टोलचा नाका होणार आहे असे समजते पण या ठीकाणी टोलनाका झाल्यानंतर आजरा तालूक्यातील आजरा ते किटवडे या भागातील स्थानिक...
घडामोडी
लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी हूकुमशाही भाजपला सत्तेतून हद्दपार करा- माजी जि.प. अध्यक्ष उमेश आपटे यांचे आजरा पश्चिम भागात आवाहन
अमित गुरव
आजरा - प्रतिनिधी.
लोकसभेची निवडणूक ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. ही कांही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही, त्यामुळे या निवडणुकीकडे गांभीर्याने पाहून लोकशाही टिकवायची असेल तर भाजपला सत्तेतून हद्दपार करा असे आवाहन माजी जि.प अध्यक्ष उमेश आपटे यांनी केले. ते किटवडे ता. आजरा येथून चालू झालेल्या जनसंपर्क यात्रेत बोलत होते. ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले कि २०१४ साली लोकांना खोटी आश्वासने...
गडहिंग्लज - (प्रतिनिधी ) - प्रतिबंध कारवाई थांबवण्यासाठी गडहिंग्लज पोलीस ठाण्यातील रेखा लोहार यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने २००० रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले.
विशेष म्हणजे ही लाच ठाण्यातच घेत होते. तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीवर गडहिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ही कारवाई टाळण्यासाठी लोहार यांनी २०००रू मागितले होते. लोहार ह्याची आजरा येथून...
वैशिष्ट्ये
जय देव जय देव जय श्री काशीबा महाराजा ||आरती ओवाळीतो ,चरणी ठेवूनिया माथा ||जय देव जय देव ||
अमित गुरव
जय देव जय देव जय श्री काशीबा महाराजा ||आरती ओवाळीतो ,चरणी ठेवूनिया माथा ||जय देव जय देव ||
संत महंताची भजने तुम्ही रेखाटली ,ग्रंथ रचना करुनी, ज्ञानगंगा पसरविली ||
दूर करुनी अज्ञाना , आम्हा उपदेशिलेतरीही पामर अज्ञानी , आम्हां न कळले ||जय देव जय देव ,जय देव जय देव जय श्री काशीबा महाराजा ||आरती ओवाळीतो , चरणी ठेवूनिया माथा ||जय देव...
मुंबई -: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीकरता 8 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. फक्त रामटेक सोडून इतर सात विद्यमान खासदारांचा यात समावेश आहे. कोल्हापुरातून उमेदवार मिळत नाही अशी सोशल मीडियावर चर्चा आणि त्यावर नानाविध पोस्ट शेअर होत होत्या . पण कोल्हापूर आणि हातकंणगले मधून पहिल्याच यादीत उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली हे विशेष.
शिवसेनेने जाहीर केलेले उमेदवार :
मावळ...
चालून आलेल्या स्वराज्यावरप्रतापराव.. ठार मारीत नाहीसतोपर्यंत तोंड दाखऊ नको आम्हासधाडला छत्रपतींनी आदेश
माफी असावी राजेहा कुडतोजी चुकलाअन्यथा धूळ चारली असतीत्या मोघली शत्रूला
मन कुठेच लागत नव्हतेराजे तुमचे पत्र वाचूनहा कुडतोजी पच्छतावलाबहालोलखानाला सोडून
नासधूस,उध्वस्त केले राज्यचालून आला स्वराज्यावरका म्हणून दिलात जीवदानराजे संतापले सरसेनापतीवर
तो शरण आला म्हणूनराजे..तलवार मागे घेतलीअन्यथा त्या हरामखोरालाजिवंत नसती सोडली
वार्ता आली कानावरतळ ठोकून होता नेसरीतघोड्यांच्या टापांचे उधळले रणांगणवेडात मराठे वीर दौडले...
घडामोडी
उत्तुरच्या केंद्रे शाळेचा विद्यार्थी आर्यन पोवार याची आजरा तालुक्यातून जि. प. शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी निवड
अमित गुरव
उत्तूर --जिल्हा परिषदेकडून आजरा तालुक्यातून उत्तुर केंद्र शाळेचा विद्यार्थ्यांची शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी एकमेव निवड करण्यात आली. यामध्ये विद्यार्थी कु.आर्यन सचिन पोवार यांचा समावेश आहें. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पहावी असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जि. प. व मनपा शाळेतील इयत्ता सहावी व आठवीतील विद्यार्थ्यांची कोल्हापूरमध्ये सरप्राईज निवड परीक्षा घेण्यात आली.या परीक्षेत कोल्हापूरसह जिल्ह्यातून सर्व बारा तालुक्यातील गेल्या दोन वर्षात पाचवी जि....
केंद्रीय निवडणूक आयोगाने काल दिनांक 16/3/2024 रोजी लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. ही निवडणूक निःपक्ष आणि पारदर्शक होण्याचा ताकतीने प्रयत्न केला जात आहे कारण यासाठी 27 ॲप लॉन्च केले असले तरी CVIGIL हे खूप महत्त्वाचे ॲप मतदारांना भेट दिले आहे ज्यातून नागरिक थेट उमेदवारांची तक्रार करू शकतो.
1 ) निवडणूक काळात पैसे वाटणे2) चुकीच्या माहितीचा प्रचार3) आचारसंहिता भंग4) मतदारांवर प्रभाव...
आचारसंहिता कधी जाहीर होते आणि कोण जाहीर करते …
निवडणूक आयुक्तांकडून आचारसंहिता लागू होते . निवडणूक प्रक्रिया चालू झाल्यापासून ते ती पूर्ण होईपर्यंत आचारसंहिता लागू होते. राजीव कुमार सध्याचे निवडणूक आयुक्त आहेत.
आचासंहिता मधील नियमावली
1) निवडणुकीत वैयक्तिक पातळीवर टीका करायची नाही.
2) धार्मिक द्वेषपूर्ण विधाने टाळणे
3) उमेदवार मतदारांना धमकाऊ शकत नाही
4) प्रचारसभा , रॅली किंवा मिरवणूक काढताना पोलिसांची पूर्वपरवानगी आवश्यक
5)...
भुदरगड (प्रतिनिधी ) - हॉटेलच्या बिल देणार नाही या कारणास्तव दारू पिऊन धिंगाणा घातला. यावरून सहाय्यक फौजदार तानाजी रामचंद्र विचारे यास जिल्हा पोलीस प्रमुखांनी ताबडतोब निलंबित केले आहे.हा प्रकार धामणे फाट्याजवळ गारगोटी पिंपळगाव रोड वर घटला. ते बुधवारी सायंकाळी जेवण्यासाठी तिथं गेले होते. पण बिल देणार नाही म्हणत धिंगाणा घातला त्याबद्दल हॉटेल मालकाने भुदरगड पोलिसात फिर्याद दाखल केली होती...










